शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

राष्ट्रवादी कॉँग्रेसने सत्ता असताना काय दिवे लावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 00:04 IST

परळी मतदारसंघातील सर्व सामान्य माणसाचा विकास हाच माझा अजेंडा आहे. त्यासाठी मला भरभरून आशिर्वाद द्या असे आवाहन भाजपा महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी केले.

ठळक मुद्देपंकजा मुंडे : परळीतल्या सर्वसामान्य माणसाचा विकास हाच अजेंडा

परळी : विरोधक हे मी बांधलेल्या रस्त्यावर थांबून माझ्यावरच टीका करतात. मी केलेला विकास त्यांना दिसत नाही का ? सत्ता असताना राष्ट्रवादीने काय दिवे लावले? राष्ट्रीय महामार्गामुळे पट्टीवडगाव आणि परिसराच्या विकासाला चालना मिळाली असून यापुढे विकासाच्या गतीचा वेग आणखी वाढणार आहे. परळी मतदारसंघातील सर्व सामान्य माणसाचा विकास हाच माझा अजेंडा आहे. त्यासाठी मला भरभरून आशिर्वाद द्या असे आवाहन भाजपा महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी केले.मतदार संघातील पट्टीवडगाव येथील प्रचार सभेत त्या बोलत होत्या. सभेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते पंढरी तारसे होते. पंकजा मुंडे म्हणाल्या, विविध योजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर विकासाला गती दिली आहे. इतर गवांप्रमाणे पट्टीवडगावलाही मोठा निधी देऊन विकास केला आहे. या भागातून राष्ट्रीय महामार्ग आणला. त्यामुळे परिसरातील विकासकामांना चालना मिळाली असून युवकांच्या हाताला काम मिळत आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी बचत गटांना पाठबळ देऊन कर्जासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे महिला स्वावलंबी झाल्याचे त्या म्हणाल्या. लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब आणि या परिसराचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. हीच परंपरा मी कायम ठेवली आहे. मी विकासाला निधी कमी पडू देणार नाही, तुम्ही मला भरभरून आशिर्वाद द्या, असा शब्द त्यांनी दिला.विजयाचे शिलेदार व्हा - देशमुखमराठा आरक्षणासाठी कायम आग्रही भूमिका घेऊन आपल्या समाजाला न्याय देणाऱ्या पंकजा मुंडे यांच्या विजयाचे शिलेदार व्हा असे आवाहन भाजपाचे प्रदेश चिटणीस राजेश देशमुख यांनी केले. ते म्हणाले, मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आरक्षणासाठी पंकजा मुंडे यांनी विशेष परिश्रम घेतले. जातीयवादी प्रचार करून समाजात दुही निर्माण करणाºया राष्ट्रवादीला धडा शिकवा. सर्व समाजाला सोबत घेऊन काम करणाºया पंकजा मुंडे यांना विजयी करा असे आवाहन देशमुख यांनी केले.व्यासपीठावर माजी सभापती अण्णासाहेब लव्हारे, सरीता दिनकर लव्हारे, संरपच प्रभावती कांबळे, उपसरपंच सुमीत्रा वाकडे, दिनकर लव्हारे, गोविंद तारसे, मधूकर लव्हारे, कारभारी लव्हारे, चंद्रकात जाधव, राजेभाऊ टोणपे, विठठल दादा कांबळे, दशरथ कांबळे, नवनाथ उपाडे आदी उपस्थित होते.‘मीच उभी आहे, असे समजून नमिता मुंदडांना आशीर्वाद द्या’केज : तुम्ही ज्या दिवशी पवारांकडे गेलात त्याच दिवशी तुमचा मुंडे साहेबांवरील हक्क संपला. माझा प्रवास परळीपासून ग्रामविकास मंत्रालयापर्यंत आणि पुढे पंतप्रधान मोदींपर्यंत आहे. आणि यांचा प्रवास परळी ते बारामती इतकाच आहे. केजच्या या निवडणुकीत मी उभी आहे, असे समजून नमिता मुंदडांना मतदानरु पी आशीर्वाद द्या, असे आवाहन पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी केले.केज तालुक्यातील बरड फाटा येथे महायुतीच्या उमेदवार नमिता मुंदडा यांच्या प्रचारार्थ त्या बोलत होत्या. व्यासपीठावर जेष्ठ नेते विक्र म मुंडे, उमेदवार नमिता मुंदडा, माधवराव मोराळे, अक्षय मुंदडा, सभापती संतोष हंगे, जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, डॉ.नेहरकर, नंदिकशोर मुंदडा, विजयकांत मुंडे, शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक, राणा डोईफोडे, भारत काळे, डॉ.योगिनी थोरात, राजेंद्र मस्के,जि. प. सदस्य अशोक लोढा, वसंतभाऊ, शिवसेना तालुका प्रमुख रत्नाकर शिंदे, सुरेंन्द्र तपसे, दयावान मुंडे,राम कुलकर्णी, रमाकांत मुंडे, दिलिप करपे, बालासाहेब भिसे,दिनकर चाटे,विष्णु घुले उपस्थित होते.

टॅग्स :BeedबीडAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019Pankaja Mundeपंकजा मुंडेBJPभाजपाparli-acपरळी