बीड: घरभेटी देणाऱ्या विद्यार्थिनीची दोन टवाळखोरांन छेड काढली. त्यांच्याविरोधात तक्रार देण्यासाठी मुलींसह प्राचार्या बीड शहर पोलिस ठाण्यात गेल्या. परंतू येथील पोलिस उपनिरीक्षकांनी आपण आजचे 'प्रमुख' असल्याचे सांगत पीडितांवरच रूबाब झाडला. एवढेच नव्हे तर त्यांना आधार देण्याएवेजी भिती दाखविण्याचाही प्रयत्न केला. यात दोघांविरोधात गुन्हाही दाखल झाला. परंतू या प्रकाराने ही कसली पोलिसिंग? असा सवाल उपस्थित होत आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांच्याशी बोलताना या अधिकाऱ्यांचा 'तोरा' कायम होता. शनिवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला.
बीड शहरात घरभेटी देण्याचे काम नर्सिंगच्या विद्यार्थीनी करत असतात. शनिवारी सकाळीही सहा जणींचा ग्रुप धांडे गल्लीत गेला. तेथे दुचाकीवरून आलेल्या दोन टवाळखोरांनी या मुलींना अडवून चिठ्ठी दिली. त्यात मोबाईल क्रमांक होता. घाबरलेल्या मुलींना पुन्हा दुसऱ्या ठिकाणी अडवले. यात इतर लोकांनी एका पकडले तर दुसरा पळून गेला. या प्रकरणात पीडित मुलीच्या तक्रारीवरून बीड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे मुलींमध्ये भितीचे वातावरण आहे.
अशोक थोरातांची धावपोलिसांकडून मुलींना भिती दाखविण्यासह तक्रार घेण्यास टाळाटाळ होत असल्याचे समजताच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात हे शस्त्रक्रिया गृहातून तातडीने पोलिस ठाण्यात दाखल झाले. १० मिनीटे त्यांनाही स्वत:ला ठाण्याचे 'प्रमुख' समजणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांनी रूबाब झाडला. आपल्याशीच असे वर्तण म्हणल्यावर सामान्यांशी कसे वागत असतील? असा प्रश्न डॉ.थोरात यांनी उपस्थित केला.
मुलगा त्रास देईल, कोर्टात जावे लागेल
पीडित मुलगी व प्राचार्या पोलिस ठाण्यात गेल्यावर त्यांच्यावरच प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. तो मुलगा खूप डेंजर आहे, नंतर त्रास देईल. गुन्हा दाखल केला तर नंतर कोर्टात जावे लागेल, असे म्हणून पीडितांनाच भीती दाखविल्याचे सूत्रांनी सांगितले. हे समजल्यावरच आपण ठाण्यात धाव घेतली, असे डॉ.थोरात यांनी सांगितले.
निरीक्षकांनी प्रशिक्षण द्यावेशहर पाेलिस ठाण्याचे शितलकुमार बल्लाळ अनेकदा तक्रारदार यांना कक्षात बोलावून घेत आधार देतात. त्यांना धीर दिल्यावर तक्रार घ्यायला सांगतात. परंतू त्यांच्याच ठाण्यातील दुययम अधिकारी असे वागत असल्याने संता व्यक्त करण्यात आला. त्यामुळे बल्लाळ यांनी अशा अधिकारी, कर्मचाऱ्यांना सामान्यांशी कसे बोलावे? याचे प्रशिक्षण देण्याची गरज आहे.