शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे यांनी हर्षवर्धन सपकाळांची री ओढली, RSSवर टीका केली; म्हणाले, “मला आवडलं की...”
2
"नेहरू नेहमी उघड्या गाडीतून फिरायचे, पण महाराष्ट्रात...! तुमची मस्ती इकडे नाही चालणार"; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
3
"पक्षात ज्येष्ठ नेत्यासारखे फिरतात पण साधा बूथ जिंकू शकत नाही"; राहुल गांधींनी काँग्रेस नेत्यांना सुनावलं
4
“छत्रपती शिवरायांबद्दल एवढेच वाटत असेल, तर शिवजयंतीला देशभरात सुट्टी जाहीर करा”: उद्धव ठाकरे
5
सासू-जावयाच्या लव्ह स्टोरीचा 'दी एंड'! नेपाळ सीमेजवळ दोघेही ताब्यात; महिलेनं रडत-रडत केला धक्कादायक खुलासा
6
तामिळनाडूला जाऊन जबाब नोंदवायला काय हरकत आहे? कुणाल कामराला अटक न करण्याचे कोर्टाचे निर्देश
7
दरोडा दहा लाखाचा अन् तपासात मिळाले अडीच कोटी; ‘लाईव्ह लोकेशन’ मिळवून दरोडा
8
तनिषा भिसे मृत्यू प्रकरण : पोलिसांनी ससूनला सादर केलेल्या अहवालानंतर चर्चा
9
आधी वडेट्टीवार, आता सपकाळ; मंगेशकर कुटुंबावर टीकेचे बाण, म्हणाले, “घटनेवरील मौन अमानुष”
10
गर्भवती मृत्यू प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या डॉ. घैसास यांना पोलीस प्रोटेक्शन..! 
11
भयानक! सवाई माधोपुरच्या त्रिनेत्र गणेश मंदिरात वाघ आला, सहा वर्षांच्या मुलाला घेऊन गेला
12
कागदपत्रे नसतील तर जुन्या मशिदींचे काय होणार? सर्वोच्च न्यायालयाने 'वक्फ बाय युजर'वर मागितले केंद्राकडे उत्तर
13
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश पुन्हा एकदा बदलणार; सहा महिन्यांसाठी बी आर गवई यांच्या नावाची शिफारस
14
"लातों के भूत बातों से नहीं मानते...!"; CM योगींच्या वक्तव्यावर ममता बॅनर्जी जाम भडकल्या, म्हणाल्या...
15
"कोर्टाच्या आदेशाची माहिती नव्हती"; नागपूर दंगलीच्या आरोपीचे घर पाडल्यानंतर पालिकेने मागितली माफी
16
पतीलाही पत्नीकडून पोटगी मिळू शकते? सर्वांना माहितीये की केवळ पत्नीलाच मिळते, कायद्यात तरतूद...
17
"चंद्रकांत खैरे शिवसेनेचे शंकराचार्य...! कडवट शिवसैनिक कसे झालात?"; राऊतांच्या प्रश्नाला खैरेंनी दिलं असं उत्तर!
18
थेट टीम इंडियात नोकरीची सुवर्णसंधी, कोण करू शकतं अर्ज? जाणून घ्या
19
“गांधी कुटुंब कायद्यापेक्षा मोठे नाही, सगळ्या देशाला माहितीये की...”; विनोद तावडेंचा पलटवार
20
"गरज पडेल तेव्हा माझा वापर..."; त्रासाला कंटाळून कर्मचाऱ्याने टॉयलेट पेपरवरच दिला राजीनामा

माझ्या बाबांचा गुन्हा कोणता? अश्रू ढाळत वैभवीच्या सवालाने गहिवरला मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 06:22 IST

धनंजय देशमुखांनी मागितली न्यायाची भीक

बारामती : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, या मागणीसह, घटनेच्या निषेधार्थ बारामतीत रविवारी सर्वधर्मीय मोर्चा काढण्यात आला. यावेळी देशमुख यांची मुलगी वैभवी हिने रडत रडत केलेल्या भाषणाने बारामतीकर गहिवरले. माझ्या वडिलांचा गुन्हा कोणता?, त्यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा झाली नाही, तर रस्त्याने जाताना धक्का लागला तरी खून होईल, अशी भीती तिने व्यक्त केली. तर पोलिसांनी वेळीच दखल न घेतल्याने ही घटना घडल्याचा आरोप देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केला.

धनंजय देशमुख म्हणाले, मी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना न्यायाची भीक मागत आहे. २८ मे २०२४ रोजी या पहिल्या घटनेची सुरुवात झाली. अवादा कंपनीच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याचे अपहरण झाले. कंपनीने २९ तारखेला एफआयआर दाखल केला. परंतु दोघांनी अपहरण केले होते. मात्र, त्यात एकाच व्यक्तीचे नाव आहे. त्याचा कुठेही तपास झाला नाही. आरोपींना कळून चुकले आपले काहीही होत नाही. त्याच अनुषंगाने सूत्रधार वाल्मीक कराह याने सूचना दिल्या. त्याप्रमाणे २९ नोव्हेंबरला खंडणी मागण्यात आली. मात्र, कोणताही गुन्हा दाखल झाला नाही.

वडिलांना एवढी क्रूर शिक्षा कशासाठी? 

वैभवी देशमुख हिने वडिलांसाठी न्याय देण्याची मागणी केली. माझ्या वडिलांची हत्या खंडणीतून झाली. ही खंडणी कोणासाठी जात होती, कोणासाठी ठेवली होती, असा सवाल तिने केला. माझ्या वडिलांनी नेमका काय गुन्हा केला होता. मागासवर्गातील बांधवाला वाचविण्यासाठी गेलेल्या माझ्या वडिलांना एवढी क्रूर शिक्षा कशासाठी, असे घडल्यास कोणीच दुसऱ्यासाठी पाऊल उचलणार नाही, अशी भीती तिने व्यक्त केली.

माझे वडील संवेदनशील मनाचे

वैभवी म्हणाली, आमचं घर माळवदाच आहे. एकदा आमच्या घरात मुंग्या झाल्या होत्या. मात्र, माझ्या वडिलांनी माझ्या आईला त्या मुंग्यांवर पावडर टाकू दिली नाही. चिकटपट्टी लावून मुंग्या खाली येण्यापासून थांबविल्या. एवढ्या संवेदनशील मनाचे माझे वडील होते. हे सांगताना वैभवीचा अश्रूचा बांध फुटला. मला माझ्या वडिलांचा शेवटचं भेटायला मिळालं नाही, याचे मला खूप दुख आहे.

राजकीय हस्तक्षेपाचे पुरावे मुख्यमंत्र्यांना देणार

धनंजय देशमुख म्हणाले, ६ डिसेंबरला आठ जण कंपनीत आले. परत एकास अमानुषपणे मारण्यास सुरुवात केली. गावातील एकाने संतोष आण्णांना फोन केला. तो सोडवायला गेला. भांडण सोडविताना त्यांना मारले. त्या विरोधात अशोक सोनवणे हा  पोलिसात तक्रार देण्यासाठी भीक मागत होता. राजकीय पाठबळामुळे एफआयआर घेतला नाही. आताही तिथे वातावरण भयावह आहे. प्रकरणातील राजकीय हस्तक्षेपाचे पुरावे आहेत. ते लवकरच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना देणार असेही ते म्हणाले. 

टॅग्स :Santosh Deshmukhसंतोष देशमुख हत्या प्रकरणBaramatiबारामतीCrime Newsगुन्हेगारीwalmik karadवाल्मीक कराड