शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
2
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
3
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
4
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
5
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
6
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
7
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
8
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
9
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
10
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
11
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
12
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
13
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
14
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
15
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
17
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
18
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
19
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
20
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?

कमी पाऊस झाला तर काय? बीड जिल्हा प्रशासन लागले कामाला, जून २०२५ पर्यंतचे नियोजन सुरू

By शिरीष शिंदे | Updated: July 1, 2024 19:06 IST

ऐनवेळी धावपळ टाळण्यासाठी उपाय

बीड : जिल्ह्यात सध्या पाणीटंचाई असल्यामुळे सध्या २७७ टँकरद्वारे ग्रामीण भागात पाणीपुरवठा केला जात आहे. पुढील काळात मोठे पाऊस होऊन धरणे भरतील अशी शक्यता आहे. जर कमी पाऊस झाला तर ऐनवेळी टेंडर काढून कंत्राटदार प्रक्रियेस वेळ लागू शकतो. त्यामुळे पुढील उपाययोजना म्हणून जिल्हा प्रशासनाने दि. ३० जून २०२५ पर्यंत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी खासगी टँकर पुरवठा कंत्राटासाठी निविदा काढण्यात आली आहे.

जून महिना सुरू झाला तर अद्यापही धरणे कोरडीच आहे. मूर पावसामुळे पेरण्या पूर्ण झाल्या असल्या तरी सर्वच्या सर्व धरणे भरणे आवश्यक आहे. पावसाळ्याचे तीन महिने अद्याप बाकी आहे. या कालावधीत चांगला पाऊस होऊन परिस्थिती पूर्णत: बदलून जाईल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यात जवळपास मार्च महिन्यापासून टँकरद्वारे पाणीपुरवठ्याला सुरुवात झाली होती. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दि. ३० जूनअखेरपर्यंत बीड जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणाऱ्या गावांना आणि वाड्यांना टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी कंत्राटदारांकडून फेर ई-निविदा मागविण्यात आल्या होत्या. 

तसेच ई-निविदा भरण्यास दि. २५ ऑगस्ट २०२३ पर्यंत मुदतवाढ दिली होती, तर ५ सप्टेंबर २०२३ रोजी सदरील निविदा उघडण्यात आल्या होत्या. त्यानंतर या विरोधात एकाने औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. त्यावर निर्णय झाल्यानंतर टँकर सुरू झाले होते. जूनमध्ये चांगला पाऊस झाल्यास टँकरची आवश्यकता लागणार नाही, असे अधिकाऱ्यांनी ग्राह्य धरले होते. जूनच्या सुरुवातीपासून चांगला पाऊस झाल्याने ग्रामीण भागातील पाणीपातळी वाढली. परिणामी, टँकरची संख्या निम्म्यावर आली आहे. दि. ७ जून रोजी बीड जिल्ह्यात ४६७ टँकर सुरू होते, तर २७ जून रोजीच्या अहवालानुसार २७७ टँकर सुरू आहेत. चांगला पाऊस झाल्याने तब्बल १९० टँकर टप्प्या-टप्प्याने बंद करण्यात आले आहेत.

निविदा पूर्ण होईपर्यंत मुदतवाढसध्या सुरू असलेल्या पाणीपुरवठा टँकर कंत्राटदारास दि. ३० जूनपर्यंत मुदत होती. चांगला पाऊस झाल्याने टँकर बंद होतील अशी शक्यता होती. परंतु अद्यापही टँकर सुरू आहेत. सध्या जिल्ह्यात २७७ टँकर सुरू आहेत, पाण्याची अडचण लक्षात घेता सध्या सुरू असलेल्या टेंडरधारकाची टँकर पुरवठ्याची मुदत दि. ३० जूनची असली तरी नवीन टँकरसाठी काढलेल्या निविदेची प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत जुन्याच कंत्राटदाराकडून जुन्या दरानुसार टँकर सुरू राहणार आहेत.

असा आहे निविदेचा कालावधीजिल्हा प्रशासनाच्या वतीने दि. ३० जून २०२५ पर्यंत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी खासगी टँकर पुरवठा कंत्राटदारासाठी निविदा काढण्यात आली आहे. दि. २५ जून ते १६ जुलै या कालावधीत निविदा ऑनलाइन पद्धतीने स्वीकारल्या जातील. त्यानंतर दि. १८ जुलै रोजी दुपारी ३ वाजता निविदा खुल्या केल्या जातील.

अडीचशेपेक्षा अधिक टँकर सुरूजिल्ह्यात सध्या अडीचशेपेक्षा अधिक टँकर सुरू आहेत. ग्रामीण भागातील लाेकांची पिण्याच्या पाण्याची अडचण होऊ नये म्हणून सध्या टँकरद्वारे पाणीपुरवठा करीत असलेल्या कंत्राटदारास नवीन टँकर निविदाप्रक्रिया पूर्ण होईपर्यंत टँकर पुरवठ्याचे पत्र दिले आहे.-शिवकुमार स्वामी, निवासी उपजिल्हाधिकारी, बीड

टॅग्स :BeedबीडWaterपाणीRainपाऊसBeed collector officeजिल्हाधिकारी कार्यालय बीड