शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

अपघातानंतर दोन तासांत काय घडलं?, चौकशी व्हायला हवी; विनायक मेटेंच्या पत्नीने व्यक्त केला संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2022 13:03 IST

विनायक मेटे यांच्या निधनाने आई, भाऊ, मुले, पत्नी आणि आप्तस्वकीय शोकसागरात बुडाले.

बीड- शिवसंग्रामचे संस्थापक व माजी आमदार विनायक मेटे यांच्या निधनाने कार्यकर्त्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. १५ ऑगस्ट रोजी शिवसंग्राम भवन येथे त्यांचे पार्थिवदेह अंतिम दर्शनासाठी ठेवले आहे. यावेळी अनेकांना शोक अनावर झाला होता. असं कसं झालं...आमचा वाघ गेला.. अशा शब्दांत कुटुंबियांनी आक्रोश केला. काळीज पिळवटून टाकणाऱ्या या प्रसंगाने उपस्थितांचे डोळे चिंब झाले होते.

अपघातानंतर एक तास मदत मिळाली नाही. १०० नंबरला फोन केला. मात्र, फोन उचलला नाही. मदतीसाठी मी  विनवणी करत होतो, मात्र कुणीही थांबत नसल्याने मी रस्त्यावर झोपलो. असे मेटे यांचा गाडीचालक एकनाथ कदम याने सांगितले. यानंतर विनायक मेटे यांच्या अपघातानंतर दोन तासांत काय घडलं? याची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी त्यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी केली आहे. विनायक मेटेंच्या अपघातानंतर घडलेल्या घटनांबाबत ज्योती मेटे यांनी संशय व्यक्त केला आहे. 

विनायक मेटे यांच्या निधनाने आई, भाऊ, मुले, पत्नी आणि आप्तस्वकीय शोकसागरात बुडाले. त्यांना लाडाने घरी बप्पा म्हणत.त्यांच्या एकेक आठवणी जागवत कुटुंबियांनी आक्रोश केला. त्यांच्या ८० वर्षांच्या मावशीने माझ्या बप्पाचे असे कसे झाले, आम्ही कोणाकडं पाहायचं, असे म्हणत आपल्या भावनांना वाट मोकळी केली. अंतर्मनातून त्यांनी फोडलेला टाहो पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले. ग्रामीण भागातून महिला, वृद्ध देखील मोठ्या प्रमाणात आपल्या लाडक्या नेत्याचे अंतिम दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. १५ ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीन वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील भातण बोगद्याजवळ मेटे यांच्या गाडीला अपघात झाला. जखमी झालेल्या मेटे यांना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मुंबईतील जेजे रुग्णालयात सायंकाळी मेटे यांच्या पार्थिवाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी बीड येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावलेल्या मराठा आरक्षणाच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी मेटे मुंबईला येत होते. 

रविवारी पहाटे पाचच्या सुमारास मेटे यांच्या गाडीच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. पुढे असलेल्या कंटेनरला गाडीने धडक दिली. चालकाच्या मागील सीटवर बसलेले मेटे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.  अपघातानंतर बराच काळ ते घटनास्थळी रक्तबंबाळ अवस्थेत पडून होते. अखेर पोलिसांना माहिती मिळताच एका रुग्णवाहिकेतून  त्यांना  कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात आणले. अपघातात मेटे यांचे अंगरक्षक राम ढोबळे हेही गंभीर जखमी झाले असून, चालक एकनाथ कदम याला किरकोळ इजा झाली. 

टॅग्स :Vinayak Meteविनायक मेटेBeedबीडAccidentअपघात