शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2024 23:52 IST

शरद पवार यांनी बीडमधील सभेत मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावरही भाष्य केलं.

Sharad Pawar ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठीच्या मतदानापूर्वी शनिवारी प्रचाराच्या तोफा थंडावल्या. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी बीड लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत सांगता सभा पार पडली. या सभेत शरद पवार यांनी सोनवणे यांना निवडून आणण्याचं आवाहन उपस्थितांना केलं. तसंच यावेळी पवार यांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावरही भाष्य केलं.

शरद पवार आपल्या भाषणात म्हणाले की, "मला आनंद आहे की शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये जन्मलेला, शेतकऱ्यांबद्दल आस्था असलेला, शेती अर्थव्यवस्थेला कारखानदारीशी जोड देण्याची किती जरूर आहे, याची जाण ज्याला समजली, अशा व्यक्तीला आणि या दुष्काळी भागामध्ये, जिरायत भागामध्ये आज कारखानदारी उभी करून शेतकऱ्यांच्या उसाला चांगला भाव देण्याचं काम जो करतो, त्या बजरंग सोनवणे यांना मोठ्या मतांनी या ठिकाणी आज आपण विजयी केलं पाहिजे. मी बीड जिल्ह्याच्या दृष्टीने एक गोष्ट मला मुद्दाम सांगायची आहे, हा जिल्हा कष्टकऱ्यांचा जिल्हा आहे, हा जिल्हा पुरोगामी विचारांना पाठिंबा देणारा जिल्हा आहे, हा जिल्हा समाजातील सगळ्या घटकांना एकत्र ठेवणारा जिल्हा आहे, आणि त्यामुळे आपल्याला समाजातील सगळ्या जाती-धर्माच्या लोकांना एक ठेवलं पाहिजे. काही लोकांचा प्रयत्न की जातीजातीमध्ये, धर्माधर्मामध्ये अंतर वाढावं, कटूता वाढावी. पण मी आपल्याला सांगू इच्छितो आणि मला या जिल्ह्यातील सामान्य माणसाचं जे अंतःकरण माहिती आहे, ते अंत:करण बघितल्यानंतर तो हिंदू असो, मुस्लिम असो, शेड्युल्ड कास्ट असो, आदिवासी असो, आज या सगळ्या समाजाचे लोक एकत्र राहून पुढे जाणे आणि जो एक छत्रपती शिवाजी महाराजांचा हा जो विचार आहे, तो विचार घेऊन आज कोणी जरांगे पुढे येत असतील, आणखी कोणी पुढे येत असतील, त्या ऐक्याच्या विचाराला ज्यांनी हातभार लावला, त्या सगळ्यांना आपण लोकांनी सहकार्य केलं पाहिजे," असं  आवाहन शरद पवार यांनी केलं आहे. 

जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?

शरद पवार यांनी आजच्या भाषणात मनोज जरांगे पाटील यांच्यासोबतच्या भेटीचाही उल्लेख केला. ते म्हणाले की, "जरांगे पाटील यांचं धोरण काय, हे समजून घेण्यासाठी मी आणि राजेश टोपे एक दिवशी या जिल्ह्यामध्ये आलो, जरांगे पाटील यांना भेटलो, त्यांना विचारलं तुमचं म्हणणं काय? आणि त्यांना एकच विनंती केली, की तुम्ही या राज्यात जो-जो कष्ट करतो जो-जो मेहनत करतो आणि शेतकऱ्यांच्या हिताची जपणूक करतो, तो कोणत्याही धर्माचा, कोणत्याही विचारांचा त्या सगळ्यांना बरोबर घेऊन सामाजिक ऐक्य आपण मजबूत ठेवू आणि एक नवीन विचार घेऊन  सबंध देशाला या रस्त्यावर आणू," असंही पवार यांनी म्हटलं आहे.

मोदींना हटवण्याचं पवार यांचं आवाहन

शरद पवार यांनी बीडमधील सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. "हा देश एकसंघ ठेवायचा असेल, तर हिंदू असो, मुस्लिम असो, दलित असो, शीख असो, ईसाई असो या सगळ्यांना एकत्र ठेवावे लागेल. या सगळ्यांचा आत्मविश्वास हा वाढवायला पाहिजे. पण दुर्दैवाने हा देशाचा प्रधानमंत्री जाहीरपणाने मुस्लिम समाजाच्या विरुद्ध बोलतो. जो समाज या देशात कष्ट करणारा सगळ्या लोकांच्या खांद्याला खांदा लावून देशाच्या भल्यासाठी कायम तत्पर आहे, त्या समाजाला बेइज्जत करण्याचं काम आज या देशाच्या प्रधानमंत्री यांनी केलं. त्याचं कारण एकच आहे की त्यांची विचारधारा एक वेगळ्या प्रकारची आहे आणि त्यांच्या मनामध्ये मुस्लिम आणि गरीब लोकांबद्दलचा द्वेष हा कायम आहे. तो द्वेष आज या ठिकाणी बघायला मिळतो, आणि म्हणून जो प्रधानमंत्री पदावर बसलेला आहे, त्याला सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय देण्याची भूमिका घ्यावी लागेल, हे मोदींकडून होत नाही. त्यामुळे मोदींना मदत होईल, अशा प्रकारचं कुठलंही काम तुम्ही आणि मी करायचं नाही हा निर्णय घेतला पाहिजे. तो निर्णय घ्यायचा असेल, तर बजरंग सोनवणे यांना मोठ्या मतांनी तुम्ही या ठिकाणी विजयी करा, आणि एक नवीन इतिहास तयार करायला हातभार लावा," असं आवाहन पवार यांनी केलं आहे.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारbeed-pcबीडmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४