शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
4
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
5
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
6
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
7
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
8
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
9
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
10
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
11
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
12
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
13
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
14
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
15
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
16
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
17
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
18
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
19
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
20
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार

‘संगीत रजनी’चे महिला वर्गातून स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2020 11:35 PM

मागील ५ वर्षापासून ३१ डिसेंबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत शिवसंग्रामच्या वतीने व्यसनमुक्तीचा संदेश देत संगीत रजनीचा कार्यक्रम घेतला जातो. यावेळी व्यसन न करण्याची शपथदेखील दिली जाते.

ठळक मुद्देनिवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी दिली व्यसनमुक्तीची शपथ

बीड : मागील ५ वर्षापासून ३१ डिसेंबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत शिवसंग्रामच्या वतीने व्यसनमुक्तीचा संदेश देत संगीत रजनीचा कार्यक्रम घेतला जातो. यावेळी व्यसन न करण्याची शपथदेखील दिली जाते. मंगळवारी बीडमधील या स्तुत्य उपक्रमाचे महिला वर्गातून स्वागत करण्यात आले.कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी आ.विनायक मेटे, नारायण गडाचे महंत हभप शिवाजी महाराज, नगराध्यक्ष डॉ.भारतभुषण क्षीरसागर, प्रभारी जिल्हाधिकारी अजित कुंभार, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, विभागीय वन अधिकारी अमोल सातपुते, समाज कल्याणचे सचिन मडावी, उपजिल्हाधिरी प्रकाश आघाव पाटील, नामदेव टिळेकर, तहसीलदार सचिन खाडे, निवृत्ती महाराज इंदुरीकर, विजयराज बंब, प्रभाकर कोलंगडे, बी.बी.जाधव आदी उपस्थित होते.आ.विनायक मेटे यांच्या संकल्पनेतून मराठवाडा लोकविकास मंच, मुंबई व कै.अण्णासाहेब पाटील प्रतिष्ठान यांच्या वतीने संगीत रजनीचा कार्यक्रम घेतला जातो. यावेळी ३१ डिसेंबर रोजी अनेकांचा दारू पिण्याकडे कल असतो. त्यादिवशी दूध देऊन नवीन वर्षाचे स्वागत या कार्यक्रमात करण्यात येते. मंगळवारी झालेल्या कार्यक्रमामध्ये मराठी-हिंदी सिनेकलाकारांनी कला सादर केली. यामध्ये अभिनेत्री, मृण्मयी देशपांडे, पल्लवी पाटील, भार्गवी चिरमुले, मयुरेश प्रेम, संसकृती बालगुडे, यांच्या नृत्याने प्रेक्षकांची मने जिंकली तर, प्रसन्नजीत कोसंबी, वैशाली माडे यांच्या गीतांनी सर्वांना मंत्रमुग्ध केले. प्रसाद खांडेकर व नम्रता संभेराव यांच्या हास्य जत्रेमुळे एकच हशा पिकला होता. या कार्यक्रमाचे निवेदन अभिनेता सिध्दार्थ चांदेकर याने केले. त्याच्या निवेदनामुळे कार्यक्रमामध्ये उत्साह निर्माण झाला होता.

यावेळी कोणीही व्यसन करु नये, यासाठी व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली.निवृत्ती महाराज इंदुरीकर देशमुख व इतरांनी मिळून उपस्थित तरुणांना व्यसनमुक्तीची शपथ दिली.यावेळी आ.विनायक मेटे यांनी तरुणांशी संवाद साधला व व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन केले.

टॅग्स :BeedबीडmusicसंगीतVinayak Meteविनायक मेटे