शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दितवा’चा प्रभाव! पाऊस झाला आता थंडी कहर करणार? महाराष्ट्रातील २ ठिकाणे सर्वाधिक गारठणार
2
आता ठाकरेंची वेळ! शिंदेच्या ठाण्यातील बडा नेता उद्धवसेनेत; म्हणाले, “सत्तेसाठी लाचारी...”
3
अयोध्येत होणार आता भव्य राम मंदिर संग्रहालय; सरकारने दिली ५२ एकर जमीन, TATA कंपनी बांधणार
4
“निवडणूक आयुक्तांच्या विरोधात महाभियोग आणण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावले पाहिजे”: नाना पटोले
5
सावंतवाडीत पोलिस ठाण्यात शिंदे सेना-भाजपाचे कार्यकर्ते भिडले; पोलिसांकडून वेळीच हस्तक्षेप
6
DRDO ची मोठी कामगिरी; 800 KM वेगावर फायटर जेट एस्केप सिस्टीमचे यशस्वी परीक्षण
7
मिशन 2026! बंगाल, असम, केरळ आणि तामिळनाडूसाठी भाजपचा प्लान तयार..!
8
२०२५ची शेवटची पौर्णिमा: ३ गोष्टी कराच, महालक्ष्मी दोन्ही हातांनी भरभरून देईल; भरभराट होईल!
9
२०२५ संपताना हवं ते देणार, ८ राशींना सगळं मिळणार; गुरु-बुधाचा षडाष्टक योग, सोन्यासारखे दिवस!
10
भाजपचे उमेदवार अजय अग्रवाल बोगस मतदान करुन घेत असल्याचा खळबळजनक आरोप ! फार्म हाऊसवर मिळाले महत्वाचे पुरावे
11
इम्रान खान जिवंत की मृत? तुरुंगात भेटायला गेलेली डॉक्टर बहीण बाहेर आली, म्हणाली... 
12
रोहित तयार, पण किंग कोहलीच्या मनात वाजतंय "आम्ही नाही जा.." गाणं; गंभीर-आगरकरचा 'तो' डाव फसणार?
13
“नगरपालिका निवडणुकीत आचारसंहितेची पायमल्ली, महायुतीविरोधात हजारो तक्रारी”; काँग्रेसची टीका
14
दिल्लीच्या CM रेखा गुप्ता यांच्या हस्ते पिकलबॉल लीग ट्रॉफीचे अनावरण; मुंबई-चेन्नईसह ६ फ्रँचायझी संघात रंगणार स्पर्धा
15
Video: निरागस बाबा..! लेकीनं दाखवलं 'कोरियन हार्ट' पण बापाला वाटलं वेगळंच.. पुढे काय झालं?
16
“शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणले?”; थेट व्हिडिओ दाखवत संजय राऊतांचा सवाल
17
प्राजक्ता-शंभूराजच्या लग्नाचा अल्बम आला समोर; राजेशाही थाटात पार पडला लग्नसोहळा
18
हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...
19
Travel : भारतीयांसाठी व्हिसा फ्री एन्ट्री! पण, मलेशिया फिरायला किती खर्च येतो? जायचा विचार करताय तर जाणून घ्या...
20
आकाशाला गवसणी! चंद्र-ताऱ्यांची स्वप्न पाहणारी भारताची मिसाईल वुमन; पुरस्काराने झाला सन्मान
Daily Top 2Weekly Top 5

गोपीनाथ मुंडे यांनी पक्ष वाड्या-तांड्यावर नेला म्हणून आज आम्ही इथे आहोत - डॉ. भागवत कराड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2021 13:15 IST

यापुढील सर्व निवडणुका स्वबळावर लढविण्याच्या उद्देशाने भाजपने केंद्रीय राज्यमंत्री डॉ. कराड यांच्या नेतृत्वात ही जनआशीर्वाद यात्रा काढण्याचे नियोजन केले आहे.

बीड : लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी भाजपा पक्ष राज्यातील वाड्या-तांड्यावर नेला. त्यांच्यामुळेच आम्ही आज येथे आहोत, असे प्रतिपादन केंद्रीय राज्य मंत्री डॉ. भागवत कराड (Dr. Bhagvat karad ) यांनी परळी येथे केले.  डॉ. कराड यांनी आज सकाळी माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde ) , खा. प्रीतम मुंडे ( Pritam Munde ) यांच्यासह सपत्नीक वैद्यनाथाच्या पायरीचे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ( We are here because of the work done by Gopinath Munde - Dr. Bhagwat Karad) 

यापुढील सर्व निवडणुका स्वबळावर लढविण्याच्या उद्देशाने भाजपने केंद्रीय राज्यमंत्री डॉ. कराड यांच्या नेतृत्वात ही जनआशीर्वाद यात्रा ( BJP's Jansanwad Yatra ) काढण्याचे नियोजन केले आहे.  भाजपाची मराठवाड्यातील जनसंवाद यात्रा केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या नेतृत्वात गोपीनाथ गडावरून सुरु झाली. बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळाली नाही. त्यामुळे त्या नाराज असल्याचे बोलले जात आहे. यातूनच त्यांचे समर्थकदेखील नाराज झाल्याचे बोलले गेले. त्यामुळे डॉ. कराड यांच्या जनआशीर्वाद यात्रेबाबत मुंडे भगिनी काय भूमिका घेतात, याकडे कार्यकर्त्यांसह सर्वांचेच लक्ष लागले होते. मात्र, आज सकाळी मुंडे भगिनी यांनी केंद्रीय मंत्री डॉ. कराड यांचे स्वागत केले. यानंतर डॉ. कराड यांनी वैद्यनाथ मंदिराच्या पायरीची सपत्नीक दर्शन घेतले. यानंतर गोपीनाथ गडावरून जनसंवाद यात्रा सुरु झाली.  

असा आहे जनआशीर्वाद यात्रेचा मार्ग- १६ ऑगस्ट रोजी परळी आणि गोपीनाथगडावरून या यात्रेची सुरुवात. १६ रोजी परळी, गोपीनाथगड, गंगाखेड, पालम, लोहा, नांदेड.- दुसऱ्या दिवशी (१७ जुलै) नांदेड, अर्धापूर, कळमनुरी ते हिंगोली मार्गावरून यात्रा जाईल. - १८ ऑगस्ट रोजी हिंगोली, जिंतूर आणि परभणी - १९ रोजी परभणी, मानवत, पाथ्री, सेलू, परतूर, वाटूर ते जालन्यापर्यंत यात्रा येईल. - २० रोजी जालना ते बदनापूर, शेकटा, करमाड, चिकलठाणा ते औरंगाबाद असा यात्रेचा मार्ग आहे. - २१ रोजी औरंगाबाद मार्गे दौलताबाद, खुलताबाद, वेरूळ, हतनूर ते कन्नडपर्यंत यात्रा जाईल, अशी माहिती प्राथमिकदृष्ट्या समोर आली आहे. 

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेPritam Mundeप्रीतम मुंडेBhagwat Karadडॉ. भागवतBeedबीडBJPभाजपा