शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

बीड शहराला १४ टँकरने पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 00:12 IST

पावसाळा सुरू झाला असला तरी अद्याप अपेक्षेप्रमाणे जिल्ह्यात वरूणराजाने हजेरी लावलेली नाही. त्यामुळे शहरात तीव्र पाणी टंचाई जाणवत आहे

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : पावसाळा सुरू झाला असला तरी अद्याप अपेक्षेप्रमाणे जिल्ह्यात वरूणराजाने हजेरी लावलेली नाही. त्यामुळे शहरात तीव्र पाणी टंचाई जाणवत आहे. सद्यस्थितीत शहरात १४ टँकरने पाणीपुरवठा केला जात असून दिवभरात ५० ते ६० खेपा केल्या जात आहेत. हद्दवाढ भागात मात्र, आजही पाणीपुरवठा विस्कळीतच असल्याचे सांगण्यात आले.जून संपून जुलैचा पहिला आठवडाही पूर्ण झाला. मात्र, अद्यापही जिल्ह्यात कोठेच वरूणराजा मनसोक्त बरसला नाही. त्यामुळे जलसाठे कोरडेठाक आहेत. बीड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पाली येथील बिंदुसरा आणि माजलगाव धरणही कोरडे पडले आहे. सध्या माजलगाव धरणात चर खोदून बीड शहराला पाणीपुरवठा केला जात आहे.मात्र, मागणीपेक्षा कमी पाणी येत असल्याने शहरात १० ते १५ दिवसानंतर नळाला पाणी येते. त्यामुळे बीडकरांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे.दरम्यान, शहरात तरी १५ दिवसाला पाणी येते. मात्र, हद्दवाढ भागात तर पाणीच येत नाही. आले तर कमी दाबाने पाणी पुरवठा होतो. हाच धागा पकडून पालिकेने शहरात १४ टँकरने पाणीपुरवठा केला आहे. हे टँकर खासकरून स्वराज्य नगर, सोमेश्वर मंदिर परिसर, संत नामदेव नगर, अंकुश नगर, बार्शी रोड, पिंपरगव्हान रोड आदी भागात आहेत. तसेच जिल्हा रूग्णालय, जिल्हा न्यायालय, जिल्हा कारागृह, वसतीगृह, शाळा आदी ठिकाणीही टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत असल्याचे सुपरवायझर पी.आर.दुधाळ यांनी सांगितले.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईwater transportजलवाहतूकDamधरण