शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जल वैभवाला बाधा; शिरूरच्या सिंदफणा नदीला घाणीची किनार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2020 16:18 IST

शिरूर येथील सिंदफणा नदी काठी मोठ्याप्रमाणावर कचरा पडलेला असतो.

ठळक मुद्देनदीच्या सौंदर्यकरणाला बाधा पोहचत असून, पाणीही दूषित होत आहे.

शिरूर कासार : प्रदीर्घ काळानंतर सिंदफणा नदी खळखळते आहे. मात्र, या नदीच्या  जल वैभवाला घाणीची किनार असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. सिंदफणा नदीकाठ म्हणजे हक्काची कचराकुंडी मानली जात असल्याने तेथे   घाणीचा विळखा पडला आहे. 

नदीकाठावर बाजार ओटे, सोमवारी भरणारा बाजार, रोजची गुजरी याशिवाय असलेले हाॅटेल, दुकानातून निघालेला कचरा इथेच टाकला जातो. नगर पंचायतीच्या घंटागाड्या फिरत असताना कचरा त्यात टाकण्याऐवजी ‘झाडला की लोटला नदीत’ अशीच मानसिकता बनत चालल्याने सिंदफणा नदीच्या सौंदर्याला बाधा पोहोचत आहे. याशिवाय नदीपात्रात सुबाभळीदेखील वाढल्या आहेत. वेळप्रसंगी नैसर्गिक विधीसाठी देखील वापर केला जात आहे.

‘स्वच्छ शहर, सुंदर शहर’ या संकल्पनेतून शहरातून नित्याने स्वच्छता केली जात असली तरी शहरालगतची नदी मात्र घाणीने व्यापली आहे. बाजाराच्या दिवशी विक्रेते त्यांचा भाजीपाला सुकू नये म्हणून नदीतील पाणी त्यावर मारतात. मग हे पाणी स्वच्छच असले पाहिजे, त्यासाठी स्थानिक प्रशासनाने लक्ष देणे जरूरी आहे. मात्र, वेळोवेळी नगर पंचायत मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीवर प्रभारी नेमणूकदेखील काही अंशी याला कारणीभूत ठरत आहे.

टॅग्स :riverनदीpollutionप्रदूषणBeedबीड