शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

माजलगाव धरणाची पाणी पातळी फूटभर वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 00:04 IST

माजलगाव धरणाची पाणी पातळी मृतसाठ्या खाली गेल्याने बीड व माजलगाव शहराला पाणी टंचाईची समस्या निर्माण होणार होणार होती, मात्र नाथसागर धरणाच्या उजव्या कालव्यातून माजलगाव धरणात पाणी सोडल्यामुळे पाणी पातळी एक फुटाने वाढली असून काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्याता आहे.

ठळक मुद्देआणखी एका आवर्तनाची गरज : नाथसागर धरणाच्या उजव्या कालव्यात सोडले पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कमाजलगाव : माजलगाव धरणाचीपाणी पातळी मृतसाठ्या खाली गेल्याने बीड व माजलगाव शहराला पाणी टंचाईची समस्या निर्माण होणार होणार होती, मात्र नाथसागर धरणाच्या उजव्या कालव्यातून माजलगाव धरणात पाणी सोडल्यामुळे पाणी पातळी एक फुटाने वाढली असून काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्याता आहे. मात्र आणखी एका आवर्तनाची गरज असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.२१ डिसेंबर पासून जायकवाडी धरणातून पैठणच्या उजव्या कालव्याद्वारे पाणी माजलगाव धरणामध्ये सोडण्यात आल्याने तेवीस दिवसात धरणाची पाणी पातली फूटभर वाढली आहे. जुलै महिन्यापासून पावसानं पाठ फिरवल्याने येथील माजलगाव धरण मृतसाठ्यातच होते.तालुक्यात हिवाळ्यातही पाणी टंचाईच्या झळा जाणवत असल्याने प्रशासनाने उन्हाळ्यात माजलगाव धरणामध्ये पिण्यासाठी पाणी आरक्षित केले होते. मात्र जायकवाडी धरणातून पैठणच्या उजव्या कालव्याद्वारे २१ डिसेंबर पासून पाणी सोडण्यात आले होते.मात्र, सोडलेल्या पाण्याचा अवैध उपसा आणि कॅनॉलला जागोजागी लागलेली गळती यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती होवून तेवीस दिवस होऊन देखील माजलगाव धरण मृतसाठ्याबाहेर आले नसून, धरणाची पाणीपातळी केवळ एक फुटाने वाढली आहे.२४ डिसेंबर रोजी माजलगाव धरणाची पाणीपातळी ४२४.७८ मीटर एवढी होती तर पाणीसाठा १०३.६० एवढा होता. तर १४ जानेवारी रोजी पाणी पातळी ४२५.०६ मीटर एवढी असून पाणीसाठा १११.२० दलघमी आहे. आजपर्यंत ९.५४९ दलघमी एवढा पाणीसाठा वाढला असल्याची माहिती धरण मुकादम एस.डी कुलकर्णी यांनी दिली. मात्र आलेल्या या पाण्यामुळे काही प्रमाणात दिलासा जरी मिळाला असला तरी देखील पाणीसंकटाची टांगती तलावार माजलगाव, बीड व या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या इतर शहरांवर आहे. त्यामुळे अजून एक पाण्याचे आवर्तन करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. त्यामुळे पाणीटंचाई काही प्रमाणात कमी होऊन उन्हाळ््याच्या दिवसात देखील दिलासा मिळेल.

टॅग्स :BeedबीडMajalgaon Damमाजलगाव धरणWaterपाणी