शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

बीड जिल्ह्यातील पाणीपातळी ७ मीटरपर्यंत घसरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2019 00:15 IST

जिल्ह्यात यंदा वार्षिक सरासरीच्या तुलनेत ५० टक्के पाऊस झाल्यामुळे दिवसेंदिवस पाणी पातळी कमालीची खालावत असून मागील पाच वर्षांच्या तुलनेत पाणी पातळी सरासरी ७ मीटरपर्यंत घटली आहे.

ठळक मुद्देजल है तो कल है : जलबचतीचा संकल्प करुया, जलपुनर्भरण चळवळीची गरज

बीड : जिल्ह्यात यंदा वार्षिक सरासरीच्या तुलनेत ५० टक्के पाऊस झाल्यामुळे दिवसेंदिवस पाणी पातळी कमालीची खालावत असून मागील पाच वर्षांच्या तुलनेत पाणी पातळी सरासरी ७ मीटरपर्यंत घटली आहे. पुढील दोन महिने तीव्र उन्हाचे जाणार असल्याने पाणीपातळी आणखी घटणार असल्याचे चित्र आहे.जिल्ह्यातील एकूण १४४ प्रकल्पांपैकी दोन मोठ्या प्रकल्पात मृतसाठा आहे. इतर तलाव कोरडेठाक पडले आहेत. परिणामी सध्या टॅँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहेत. जिल्ह्यात सध्या ५७० टॅँकरने पाणीपुरवठा होत असून ही संख्या येत्या काही दिवसांत वाढणार आहे.भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेच्या वतीने आॅक्टोबरअखेर पावसाळा संपल्यानंतर जलस्त्रोत असलेल्या १२६ विहिरींची पाणीपातळी मोजण्यात आली होती. मागील पाच वर्षांतील आॅक्टोबरमधील सरासरी पाणी पातळीच्या तुलनेत ४ मीटरने घसरण झाल्याचे निदर्शनास आले होते. तर जानेवारीत केलेल्या तपासणीनंतर आॅक्टोबरमधील पाणीपातळी आणखी खोलवर गेल्याचे समोर आले. ही पाणीपातळी एकूण ७ फूट खोलपर्यंत गेली आहे.मार्चच्या सुरुवातीपासून उन्हाची तीव्रता वाढली आहे. वाढते तापमान पाहता उपलब्ध पाण्याचे बाष्पीभवन होत आहे. मार्चचे दहा दिवस तसेच एप्रिल व मे आणि जूनमध्ये पावसाचे आगमन होईपर्यंत मोठ्या प्रमाणात टंचाई भेडसावणार आहे.अशा परिस्थितीत पावसाच्या पाण्याचा पूर्ण उपयोग करणे महत्वाचे आहे. बीड जिल्ह्यात वार्षिक सरासरी ६६६ मिमी पाऊस पडतो. यंदा मात्र सरासरीच्या तुलनेत निम्माच पाऊस झाला आहे. त्यामुळे सर्वच ११ तालुके सध्या पाणी टंचाईला सामोरे जात आहेत.पाच महिन्यांत तीन मीटर खोली वाढली : पुढचे दोन महिने संकटाचेआॅक्टोबरमध्ये करण्यात आलेल्या पाहणीत जिल्ह्यातील भूजल पातळीत सरासरी ४ मीटरने खालावली होती. त्यानंतरच्या पाच महिन्यात आणखी तीन मीटरने भूजल पातळीत घट झाली. पाण्याचे वाढते दुर्भिक्ष्य लक्षात घेता सामाजिक संघटना विविध उपक्रम राबवत आहेत, तर सोशल मीडियावरूनही थेंब थेंब वाचविण्यासाठी जलबचतीचा संदेश दिला जात आहे. पाण्याचे जतन करणे, योग्य वापर करणे, अनमोल ठेवा म्हणून पाणी हाताळणे यासाठी इतरांना प्रेरित करण्यासाठी शपथ अभियान देखील राबविण्यात येत आहे.

टॅग्स :Beedबीडwater scarcityपाणी टंचाई