शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

१७ दिवसांपासून पाण्याची बोंब; महिलांचा मुख्याधिकाऱ्यांच्या दालनामध्येच ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 23:50 IST

बीड : मागील १७ दिवसांपासून पाणी पुरवठा न झाल्याने शहरातील स्वराज्यनगर भागातील महिलांनी गुरुवारी नगर पालिकेत मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या ...

ठळक मुद्देआंदोलकांचा रुद्रावतार पाहून प्रशासन ताळ्यावर : पाणीपुरवठा विभागाला दिले आदेश

बीड : मागील १७ दिवसांपासून पाणी पुरवठा न झाल्याने शहरातील स्वराज्यनगर भागातील महिलांनी गुरुवारी नगर पालिकेत मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या मांडला. मागील काही दिवसात पाणीपुरवठा विस्कळीत झाल्यामुळे अनेक भागात अवेळी पाणीपुरवठा होत आहे.शहरातील जुने आरटीओ कार्यालयाच्या मागील स्वराज्य नगर भागात १९ मे रोजी नगर पालिकेचा पाणी पुरवठा करण्यात आला होता. त्यानंतर ६ जूनपर्यंत पाणी पुरवठा झालेला नाही. त्यामुळे पाण्यासाठी या भागातील नागरिकांना परिसरात इतरत्र भटकंती करावी लागत आहे.स्वराज्य नगर भागाला पाणी पुरवठा ज्या टाकीवरुन केला जाते, त्या टाकीवरुन टॅँकर भरून दिले जात आहेत, मात्र या भागाकडे पाणी पुरवठा करण्याकडे साफ दुर्ल झाले आहे. आज, उद्या पाणी येई या प्रतीक्षेत १७ दिवस होऊनही पाणी पुरवठा न झाल्याने संतप्त महिला व नागरिकांनी थेट पालिका कार्यालय गाठले. मुख्याधिकाºयांच्या दालनात तासभर ठिय्या मांडत सुरळीत व आठ दिवसाआड नियमित पाणी पुरवठ्याची मागणी लावून धरली. वेळीच पाणी पुरवठा न झाल्यास येडशी - औरंगाबाद महामार्गावर रास्ता रोको आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला.सदरील आंदोलनामध्ये आशा घोडके, मंगल बिडवे, सी. एन. चाळक, राणी कल्याणकर, प्रयागबाई खामकर, र्वो शिंदे, स्वाती काळे, कल्पना सुरवसे, रेखा धांडे, वैशाली काळे, नंदिनी तागड, उर्मिलाराऊत, श्रीनंदा घोडके, वर्षा जोगदंड, संगीता खाडे, त्रिवेणी मानकर, इंदुमती सोळंके, वंदना मुळे, आशा देवकर, राधा रोडगे, अनिता काळे, अनिता विरेकर, जिजाबाई सातपुते, रेखा उबाळे, अरुणा पवार, अंजली सोनवळकर यांच्यासह स्वराज्य नगरमधील महिला, पुरषांनी भाग घेतला.दरम्यान आंदोलकांचा आक्रमक पवित्रा लक्षात घेत स्वराज्य नगर भागाला तत्काळ पाणी पुरवठा करुन अहवाल सादर करण्याचे आदेश प्रभारी अधिकाºयांनी पाणी पुरवठा विभागाला दिले. स्वराज्य नगरप्रमाणे शहरातील इतर भागातही पाणी टंचाईचा प्रश्न वारंवार जाणवत आहे.

टॅग्स :Beedबीडwater shortageपाणीटंचाईWomenमहिलाagitationआंदोलन