लोकमत न्यूज नेटवर्क , बीड : सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट केलेल्या तरुणाला सायबर पोलिस ठाण्यातून संपर्क केला. हे कॉल वारंवार येत असल्याने त्याने कराड याला संपर्क केला. यात कराडने महिला अधिकाऱ्यांशी संवादही साधला; कॉल बंद केल्यावर त्याने ‘इथं बाप बसलाय’, असे विधान केले. याची क्लिप व्हायरल झाली आहे.
पोस्ट नाशिकच्या तरुणाने व्हायरल केली होती. त्याला उपनिरीक्षक निशिगंधा खुळे यांनी संपर्क करत पोस्ट काढून टाकण्यास सांगितले; परंतु त्या तरुणाने कराड याला संपर्क केला. कराडने खुळे यांना कॉल केला. यात तो खुळे यांना सहकार्य करा, असे सांगत आहे. खुळे यांनी पोस्ट डिलीट करायला सांगा, असे म्हणत फोन कट केला. त्यानंतर कराड हा कार्यकर्त्याला ‘अशा गोष्टी इग्नोर करायच्या, इथं बाप बसलाय’, असे म्हणाला.
६०० वादग्रस्त पोस्ट डिलीटसोशल मीडियावरील जवळपास ६०० पोस्ट सायबर पाेलिस ठाण्यातून डिलीट करण्यात आल्या होत्या. अनेकांवर प्रतिबंधात्मक कारवाईही केली होती.
दुसरा कॉल व्हायरलचार दिवसांपूर्वीच वाल्मीक कराड आणि बीड शहर ठाण्याचे पोलिस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांच्या संवादाची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. ही क्लिप व्हायरल करणाऱ्या सनी आठवलेवर बीड पोलिसांनी मकोका लावला आहे.
खुळे डॅशिंग अधिकारीनिशिगंधा खुळे या डॅशिंग अधिकारी आहेत. कराडसोबतच्या संभाषणात त्यांनी वादग्रस्त पोस्टबाबत विधान केल्याचे दिसत आहे.यासंदर्भात त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांचा फोन बंदहोता. त्या सुटीवर असल्याचेसांगण्यात आले.