शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
4
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
5
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
6
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
18
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
19
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
20
शिमला कराराने सुटलेले भारत-पाकिस्तानमधील वाद; आता पाक देतोय रद्द करण्याची धमकी...

गुडघाभर पाण्यातून रोज अडीच किमी पायपीट, कधी साप आढळतात, कधी रानडुकरे धावतात, पिंपळवाडीत विद्यार्थ्यांची जीवघेणी कसरत

By संजय तिपाले | Updated: September 18, 2022 14:34 IST

beed News: अवघड वळणाची, नद्या, ओढ्यांची वाट... पावसाळ्यात गुडघाभर पाणी, चिखल अन् रस्त्याला आलेले डबक्याचे स्वरुप... कधीसाप दिसतात तर रानडुकरे आडवी येतात. मात्र, शाळेच्या ओढीने पाऊणशे विद्यार्थी ही कसरत रोजच करतात.

बीड - अवघड वळणाची, नद्या, ओढ्यांची वाट... पावसाळ्यात गुडघाभर पाणी, चिखल अन् रस्त्याला आलेले डबक्याचे स्वरुप... कधीसाप दिसतात तर रानडुकरे आडवी येतात. मात्र, शाळेच्या ओढीने पाऊणशे विद्यार्थी ही कसरत रोजच करतात. तालुक्यातील पिंपळवाडी परिसरातील वस्त्यांवरील हे चित्र ग्रामीण विद्यार्थ्यांची शिक्षणाची वाट अद्यापही कशी बिकट आहे, हेच दर्शवते.

पिंपळवाडी हे डोंगरदऱ्रूात वसलेले गाव. शेतीकामे सुलभ व्हावीत म्हणून काही कुटुंबे शेतात स्थलांतरित झाली अन् पाहता- पाहता वेगवेगळ्या वस्त्या तयार झाल्या. बहिरवाल, खटाणे, चादर, सटवाई व तुपे या नावांनी ओळखल्या जाणाऱ्रूा वस्त्यांवर कुटुंबांची संख्या वाढत गेली. मात्र, या वस्त्या मूलभूत सोयींपासून दूरच राहिल्या. दळणवळणासाठी ना धड रस्ता आहे ना वाहनांची सुविधा. पावसाळ्यात वाहने उभी करुन पायी ये- जा केल्याखेरीज पर्याय नसतो. याचा फटका वृध्द, महिला, रुग्णांना तर बसतोच,पण विद्यार्थ्यांना रोजच कसरत करावी लागते. लोकवर्गणीतून २५ हजार रुपये गोळा करुन ग्रामस्थांनी तात्पुरती डागडुजी केली आहे. जेसीबीद्वारे पाणी एका बाजूने काढून देत मुरुम टाकला, पण हक्काच्या रस्त्याची वस्तीवरील लोकांना प्रतीक्षाच आहे.

....एक नदी अन् तीन ओढे

या पाच वस्त्यांपासून गावाचे अंतर अडीच किलोमीटर आहे. पाणंद रस्त्यातून ये- जा करावी लागते. वाटेत बिंदुसरा नदी व तीन ओढे लागतात. पावसाळ्यात त्यास पाणी आल्यावर दोन्ही काठांवर ताटकळ बसावे लागते.....

स्वतंत्र शाळा सुरु करावी

पहिली ते दहावीपर्यंतची जवळपास ७५ मुले या वस्त्यांवरुन गावात शिक्षणासाठी ये- जा करतात. पाठवी दफ्तराचे ओझे घेऊन मुलांना चिखल तुडवत पाण्यातून वाट काढावी लागते. विद्यार्थी संख्या अधिक असल्याने वस्तीवर जिल्हा परिषदेने स्वतंत्र शाळा सुरु करावी, अशी मागणी माजी सरपंच युवराज बहिरवाळ यांनी केली आहे. याबाबत मंत्री संदीपान भुमरे, शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांना भेटून कैफियत मांडली आहे. प्रशासनाने यासाठी तातडीने पाऊले उचलावीत,असे ते म्हणाले.....

विद्यार्थी म्हणतात...शाळेत जाण्यासाठी घरातून दोन तास आधीच निघावे लागते, घरी पोहोचायलाही तेवढाच वेळ लागतो. शुज, चप्पल घालता येत नाही. त्यामुळे रोजच त्रास सहन करावा लागतो.

- पूजा बहिरवाळ, विद्यार्थिनी...

पाण्यातून जपून पाऊले टाकावी लागतात. दगड, काटे टोचतात. कधी सापाची भीती असते, तर रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी ऊसाची शेती असल्याने रानडुकरांची दहशत असते.

- अंकिता बहिरवाळ, विद्यार्थिनी

टॅग्स :Educationशिक्षणStudentविद्यार्थीBeedबीड