शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

बीडमधील कॉफीशॉपमध्ये आंबटचाळे; अपर पोलीस अधीक्षकांच्या स्टिंगमध्ये ‘दुकानदारी’ चव्हाट्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2019 11:55 AM

कॉफीशॉपमधून अर्धनग्न अवस्थेतील युगुल ताब्यात

ठळक मुद्देशॉपमध्ये बसण्याचे वेळेनुसार दर युगुलांसाठी ‘स्पेशल’ व्यवस्था

- सोमनाथ खताळ

बीड : कॉफी पिण्याच्या नावाखाली कॉफी शॉपमध्ये बसून आंबटचाळे करणाऱ्या युगुलाचा अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांनी पर्दाफाश केला. तसेच कॉफीशॉपवाल्यांची ‘दुकानदारी’ चव्हाट्यावर आणली. अर्धनग्न अवस्थेतील एका युगुलाला रंगेहाथ पकडले. बुधवारी रात्री ७ ते ९ दरम्यान असे दोन तास कबाडे यांनी बीड शहरात फिरून स्टिंग केले.

शहरात अनेक सार्वजनिक ठिकाणी तरुण धुम्रपान, मद्यपानासारखी व्यसने करतात. याचा त्रास ये-जा करणाऱ्यांसह परिसरातील व्यापारपेठेला होतो. तसेच शाळा, महाविद्यालय, शिकवण्यांच्याजवळ कॉफी शॉप उघडले आहेत. कॉफी पिण्याच्या नावाखाली युगुलांसाठी हा जणू ‘अड्डा’च ठरत आहे. हाच धागा पकडून बुधवारी रात्री ७ वाजता विजय कबाडे यांनी स्वत: दुचाकीवरुन शहरात फेरफटका मारला. आधी सिध्दीविनायक कॉम्प्लेक्समध्ये कॉफीबरोबर सिगारेटचा झुरका ओढणाऱ्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा अडगळीच्या ठिकाणी असलेल्या कॉफीशॉपकडे वळवला.

शाहूनगर भागातील दहावी, बारावीच्या शिकवणीसह एक महाविद्यालय असलेल्या अपार्टमेंटच्या तळमजल्यातील एका कॉफीशॉपवर अचानक धाड टाकली. यावेळी एक युगुल पडद्याआड अर्धनग्न अवस्थेत दिसून आले. या दोघांना ताब्यात घेऊन शिवाजीनगर पोलिसांच्याकडे देण्यात आले. ही कारवाई विजय कबाडे यांच्यासह विशेष पथकाचे प्रमुख रामकृष्ण सागडे, पांडुरंग देवकते, रेवणनाथ दुधाणे, जयदीप सोनवणे, काकडे, गणेश नवले, हनुमान राठोड, अंकुश वरपे, सूरज काकडे आदींनी केली.

पालकांचे मुलांकडे दुर्लक्षशाळा, महाविद्यालयासह शिकवणीच्या नावाखाली आपले पाल्य तासन्तास घराबाहेर असते. खरोखरच ते शिक्षणासाठी जातात काय ? याची पालकांनी तपासणी करणे गरजेचे आहे. सर्वच मुले वाईट नाहीत. मात्र, मुलांवर लक्ष ठेवण्याची गरज आहे. गैरकृत्य टाळण्यासाठी मुलांशी वारंवार संवाद साधून त्यांचे ‘लोकेशन’ वेळोवेळी घेणे गरजेचे आहे. त्याचबरोबर आपल्या मुलांना पॉकेटमनी किती द्यायचा ? पॉकेटमनी कशासाठी वापरतात याचाही विचार करण्याची गरज आहे.

शॉपमध्ये बसण्याचे वेळेनुसार दर : युगुलांसाठी ‘स्पेशल’ व्यवस्थाशॉपमध्ये बसायचे असेल तर त्यासाठी वेळेनुसार वेगवेगळे दर ठरविण्यात आले आहेत. युगुलासाठी २०० ते ३०० रुपये वसूल केले जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.पोलिसांनीधाड टाकलेल्या कॉफीशॉपमध्ये युगुलांसाठी बसण्याची स्वतंत्र व्यवस्था होती. दोन खुर्च्यासह बाजूने पडदे होते. तसेच ही व्यवस्था किचन रुमच्या बाजूस असल्याने इकडे कोणीही फिरकत नव्हते. इथे बसण्यासाठी अगोदरच ‘बुकींग’ करावी लागते. 

सीसीटीव्ही फुटेज ताब्यातकॉफीशॉपमध्ये दिवसभर अनेक युगुल बसून आंबटचाळे करीत असल्याचे चौकशीतून समोर आले. हाच धागा पकडून याच कॉफीशॉपमधील सर्व सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले आहे. शॉपचालक राज संजीवन शिंदे याला ताब्यात घेतले आहे.

फुटेजवरुन ‘ब्लॅकमेलिंग’ ?कॉफीशॉपमध्ये आंबटचाळे करताना दुकानमालक सीसीटीव्ही फुटेजवरुन युगुलांना ब्लॅकमेल करण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. कसलीही काळजी न घेता युगुल असे कृत्य करीत असल्याने धोक्याची घंटा नाकारता येत नाही.

धुम्रपान करणारे ११ युवक ताब्यात...सिध्दीविनायक कॉम्प्लेक्समध्ये बसून सिगारेट ओढणाऱ्या ११ युवकांनाही ताब्यात घेण्यात आले. त्यांना बीड शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. कोटपा कायद्यांतर्गत कारवाई करुन त्यांना सोडून दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले.

इतर कॉफीशॉपचीही झाडाझडतीरात्री उशिरापर्यंत दुचाकीवरुन अपर अधीक्षक विजय कबाडे हे स्वत: शहरातील विविध कॉफीशॉपची झडती घेत होते. मात्र, इतर ठिकाणी असे गैरकृत्य करताना आढळून आले नाही.

कॉफीशॉपसह सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान, मद्यपान करण्यासह काही युगुल अश्लील चाळे करीत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे स्वत: फिरुन कारवाया केल्या. यापुढे असे प्रकार होणार नाहीत त्या दृष्टीने तात्काळ उपाययोजना केल्या जातील. तसेच पालकांनीही मुलांकडे लक्ष द्यावे.- विजय कबाडे, अपर पोलीस अधीक्षक

टॅग्स :BeedबीडPoliceपोलिसraidधाड