शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

अफवा पसरविणाऱ्यांना मतदारच शिकवतील धडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 23:43 IST

राष्ट्रवादीचे अफवातंत्र मला अडचणीत आणण्यासाठी आहे पण परळीची स्वाभिमानी जनता त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.

ठळक मुद्देपंकजा मुंडे यांचा ‘लोकमत’शी संवाद : मतदारांचा माझ्यावर, माझा मतदारांवर भरोसा

सतीश जोशी ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : पराभव समोर दिसत असल्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरत असून राष्टÑवादी काँग्रेसकडून चुकीच्या अफवा पसरवून वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न केला जात आहे. परळीत मला निवडणूक अवघड असल्याची अफवा हा त्याचाच एक भाग आहे. परळी मतदारसंघातील जनता कायम माझ्यासोबत आहे. मतदारांनो, असल्या अफवांवर विश्वास ठेवू नका. राष्ट्रवादीचे अफवातंत्र मला अडचणीत आणण्यासाठी आहे पण परळीची स्वाभिमानी जनता त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.औरंगाबादेतील एका पत्रकार परिषदेत मी दिलेल्या उत्तराची तोडमोड करून तो व्हिडीओ एका चॅनलवरून दाखविला आणि त्याची क्लिप सोशल मीडियावरून फिरवली जात आहे. पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाचे मी सविस्तर उत्तर दिले असतानाही ते अर्धवट दाखवून जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. पाच वर्षे मी माझा मतदारसंघातच काय संपूर्ण बीड जिल्हा, राज्यात माझ्या खात्यातर्फे अनेक विकासाच्या योजना राबविल्या, विकास कामांना भरीव निधी दिला. मी विकासाचे राजकारण करणारी आहे. मी केलेली विकास कामे हीच माझी ताकद आहे. मी पाच वर्षे काय केले हे जनतेला चांगलेच माहीत आहे म्हणून मायबाप मतदार हे अशा अफवा अथवा भूलथापांना बळी पडत नाही, असेही पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितले.मी निवडणुकीपुरती लोकांसमोर जात नाही तर पाच वर्षे त्यांच्या संपर्कात विकास कामांच्या माध्यमातून असते. मी पाच वर्षे काय केले हे मला निवडणुकीत मतदारांना सांगावे लागत नाही, ते मतदारांसमोर असते. त्यामुळेच मतदारांचा माझ्यावर आणि माझा मतदारांवर भरोसा आहे. मी कधी मतांचे राजकारण केले नाही तर विकासाचे केले आहे. म्हणूनच आम्ही मतदारांच्या मनात आहोत आणि मनात असल्यामुळेच ते आमच्या मतात परावर्तित होते. खोटेनाटे व्हिडीओ क्लिप, मेसेज फिरवून मते मिळत नसतात किंवा मतदारांना जिंकता येत नाही तर त्यासाठी विकास कामे करावी लागतात, असेही पंकजा मुंडे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.राष्ट्रवादी काँग्रेस मला अडचणीत आणण्यासाठी राज्य पातळीपासून गाव पातळीपर्यंत प्रयत्न करीत आहे, हे आता जनतेलाही माहीत झाले आहे. मला रोखण्यासाठी माझ्या वाटेत काटे पेरण्याचे पाप राष्ट्रवादीकडून केले जात असले तरी माझ्यावर प्रेम करणाºया जनतेसाठी मी पायघड्याच घालणार आहे. कारण माझ्या बाबांपासून जनता आमच्या सोबत आहे. त्यांचे उपकार कधीही विसरता येणार नाहीत. मला कितीही त्रास झाला तरी जनतेला विकास देण्यात मी कमी पडणार नाही. लोकनेते गोपीनाथराव मुंडेसाहेब यांचा जनसेवेचा वसा आणि वारसा चालविण्यासाठी मला मतदारांनी भरभरून आशिर्वाद द्यावा असे आवाहनही पंकजा मुंडे यांनी केले.५ वर्षे मतदारांच्या संपर्कात : जनतेला सत्य माहीतमुंडेसाहेबांनी वंचित आणि उपेक्षतिांचा आवाज बणून काम केले, मीसुद्धा सत्तेचा वापर सामान्य जनतेच्या हितासाठी करीत आहे. मतदारांनी आम्हाला भक्कम साथ देत आमच्यावर खूप उपकार केले आहेत, त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही.मला अडचणीत आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रसचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत, पण तुमच्या बळावर राष्ट्रवादीला मी पुरु न उरणार आहे. तुम्हाला अभिमान वाटेल असे काम करणार आहे.निवडणुका येतात, जातात. परंतु, राजकारण करताना सकारात्मकता असली पाहिजे. आम्ही नेहमी विकासाचेच राजकारण करतो, असे पंकजा म्हणाल्या.

टॅग्स :BeedबीडAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019beed-acबीडPankaja Mundeपंकजा मुंडे