शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

आवाजाचा नमुना घ्यायचा; सुदर्शन घुलेला पुन्हा पोलिस कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 19:26 IST

सीआयडीकडून खंडणीच्या गुन्ह्याचा तपास

बीड : पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्याला खंडणी मागितल्याच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या सुदर्शन घुलेची आता तीन दिवस पोलिस कोठडी घेण्यात आली आहे. त्याचा आवाजाचा नमुना घेण्यासाठी सीआयडीने ही कोठडी मागितली आहे. बुधवारी त्याला केज न्यायालयात हजर केले होते.

केज तालुक्यातील मस्साजोग येथे पवनचक्कीचे काम करणाऱ्या आवादा कंपनीच्या अधिकाऱ्याला दोन कोटींची खंडणी मागण्यात आली होती. यामध्ये वाल्मीक कराड, विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्याविरोधात केज ठाण्यात ११ डिसेंबर २०२४ रोजी गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणात आतापर्यंत कराड आणि चाटे यांची पोलिस कोठडी घेऊन आवाजाचा नमुना घेण्यात आला होता; परंतु सुदर्शन घुलेला आता पहिल्यांदाच खंडणीच्या गुन्ह्यात पोलिस कोठडी घेण्यासाठी बुधवारी केज न्यायालयात हजर केले होते. यामध्ये त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे. घुलेच्या आवाजाचा नमुना तर घेतलाच जाणार आहे, शिवाय इतरही काही महत्त्वाची माहिती त्याच्याकडून मिळण्याची शक्यता असल्याचे सीआयडीतील सूत्रांनी सांगितले. सध्या कराड आणि चाटे हे दोघेही न्यायालयीन कोठडीत आहेत.

कराड, चाटेच्या अहवालाची प्रतीक्षाविष्णू चाटे याच्या मोबाइलवरून वाल्मीक कराड हा अधिकाऱ्याला बोलला होता. याची रेकॉर्डिंग सीआयडीच्या हाती लागली होती. त्यामुळे या दोघांचेही आवाजाचे नमुने यापूर्वी घेतले होते. आता घुलेचा आवाजाचा नमुना घेण्यासाठी तीन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे, तर या आगोदर पाठविलेल्या नमुन्यांच्या अहवालाची प्रतीक्षा सीआयडीला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीडbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरण