शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

खंडणी प्रकरणानंतर सरपंच देशमुख हत्येप्रकरणी विष्णू चाटेला २ दिवसांची पोलीस कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 18:23 IST

आरोपी १९ दिवसांपासून ताब्यात असताना त्याचा मोबाईल तपास अधिकाऱ्यांना हस्तगत करता आला नाही; न्यायालयाचे ताशेरे

केज ( बीड) : खंडणीच्या गुन्ह्यात शुक्रवारी न्यायालयीन कोठडी मिळालेल्या विष्णू चाटेला सरपंच संतोष देशमुख हत्ये प्रकरणात पोलिसांनी पुन्हा अटक केली. शनिवारी केज येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश कुणाल जाधव यांनी त्याला सोमवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

शनिवारी दुपारी 12:25 वाजता विष्णू चाटे याला केज येथील पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्याठिकाणी न्यायालयीन कामकाजाची पूर्तता करण्यात आल्या नंतर त्याला 1: 18 वाजता केज येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात त्याला आणण्यात आले. 1:30 वाजता प्रत्यक्ष न्यायालयीन कामकाजाला प्रारंभ झाला. यावेळी सरकारी वकील अॅड बाळासाहेब कोल्हे यांनी आणखीन काही तपास करणे असल्यामुळे विष्णू चाटेला 8 दिवस पोलीस कोठडी देण्याची मागणी केली.त्याला आरोपीचे वकील अॅड राहुल मुंडे यांनी आक्षेप नोंदविला व यापुढे पोलीस कोठडीची आवश्यकता नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. दरम्यान, दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश कुणाल जाधव यांनी विष्णू चाटेला सोमवारपर्यंत दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

न्यायालयाचे ताशेरे..!विष्णू चाटेकडून त्याचा मोबाईल हस्तगत करण्यासह , हा गुन्हा संघटित गुन्ह्याचा भाग असल्यामुळे सर्व आरोपींना एकत्र बसवून चौकशी करायची आहे. व इतर प्रकारचाही तपास करण्यासाठी त्याला 8 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात यावी. असा युक्तिवाद सरकारी वकील अॅड. बाळासाहेब कोल्हे यांनी केला. त्याला आरोपीचे वकील अॅड. राहुल मुंडे यांनी आक्षेप घेतला 25 दिवसापासून आरोपी पोलीस कोठडीत असताना तपास अधिकाऱ्यांनी कोणता तपास केला? असा प्रतिप्रश्न उपस्थित करून, या प्रकारणातील जवळपास सर्व आरोपी पोलीस कोठडीत आहेत,  आरोपीचे 5 मोबाईल,3 जीप सह, सरपंच हत्येवेळी वापरण्यात असलेली सर्व हत्यारे जप्त करण्यात आले आहेत. त्यामुळे आता पोलीस कोठडीची आवश्यकता नसल्याचा युक्तिवाद  अॅड. राहुल मुंडे यांनी केला. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने आरोपी 19 दिवस तुमच्या ताब्यात असताना त्याचा मोबाईल तपास अधिकाऱ्यांना हस्तगत करता आला नाही. मग काय केले.? असे ताशेरे न्यायाधीश कुणाल जाधव यांनी तपास अधिकाऱ्यांवर ओढले. व विष्णू चाटे याला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

दोन्हीही गुन्ह्यात मोबाईल महत्वाचा..!सरपंच संतोष देशमुख हत्ये वेळी आरोपीनी मारहाण करताना केलेले कॉल व व्हिडिओ कॉल विष्णू चाटेला केले आहेत का? व 2 कोटीच्या खंडणी आणि अधिकाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी विष्णू चाटेच्या मोबाईल वरूनच दिली आहे का? यांचा तपास करण्यासाठी विष्णू चाटे यांचा मोबाईल हा दोन्हीही गुन्ह्यात महत्वाचा असल्यामुळे हा मोबाईल जप्त करण्यासाठी तपास अधिकारी त्याची कसून चौकशी करीत आहेत. परंतु खंडणीच्या गुन्ह्यात विष्णू चाटे तपास कामी सहकार्य करीत नसल्याचा आरोप तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात केला होता. हा मोबाईल सापडल्यास अनेकांच्या अडचणी वाढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :beed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणBeedबीडCrime Newsगुन्हेगारी