शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

विष्णू चाटे, जयराम चाटेची चार तास चौकशी; केजनंतर एसआयटीने नेले बीडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 18:11 IST

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा आणि खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपींचा एकमेकांशी काही संबंध आहे का? याची चौकशी सीआयडी आणि एसआयटीचे अधिकारी करीत आहेत.

केज : तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी जयराम चाटे (रा. मैंदवाडी) व अवादा ऍनर्जी कंपनीच्या अधिकाऱ्यांना दोन कोटी रुपयांची खंडणी मागून त्यांना धमकी दिल्याच्या आरोपातील विष्णू चाटे (रा. कौडगाव) या दोघांची एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी केज पोलिस ठाण्यात चार तास चौकशी केली. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा आणि खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपींचा एकमेकांशी काही संबंध आहे का? याची चौकशी सीआयडी आणि एसआयटीचे अधिकारी करीत आहेत.

सरपंच संतोष देशमुख यांचे ९ डिसेंबर रोजी दुपारी अपहरण करून आरोपींनी त्यांची क्रूरपणे हत्या केल्याच्या आरोपाखाली सध्या सहा आरोपी पोलिस कोठडीत आहेत. तर मस्साजोग शिवारातील अवादा ऍनर्जी कंपनीच्या अधिकाऱ्यांना दोन कोटी रुपयांची खंडणी मागून त्यांना धमकी दिल्याच्या आरोपाखाली वाल्मीक कराड आणि विष्णू चाटे पोलिस कोठडीत आहेत. केज न्यायालयासमोर आरोपींना हजर केले असता, खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपी विष्णू चाटे याने त्याचा मोबाइल अद्याप तपासी अधिकाऱ्यांना दिलेला नाही. त्यामुळे त्याला सात दिवसाच्या पोलिस कोठडीची मागणी शासनाने नियुक्त केलेले सरकारी वकील ॲड. जितेंद्र शिंदे यांनी केली होती. त्यानंतर विष्णू चाटे याला १० जानेवारीपर्यंत चार दिवस पोलिस कोठडीचे आदेश मुख्य न्या. पावसकर यांनी दिले होते. दरम्यान, विष्णू चाटेकडील मोबाइलच्या शोधासाठी व इतर महत्त्वाच्या तपासासाठी विष्णू चाटे व जयराम चाटे या दोघांना बुधवारी दुपारी एक वाजता केज पोलिस ठाण्यात आणले होते. येथे तब्बल चार तास दोघांचीही चौकशी झाली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका कार्यालयाची झडतीखंडणीच्या आरोपाखाली पोलिस कोठडीतील विष्णू चाटे हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा माजी तालुकाध्यक्ष असल्यामुळे तालुका संपर्क कार्यालयात या प्रकरणाचे काही धागेदोरे मिळतात का? किंवा विष्णू चाटे याचा मोबाइल हस्तगत करण्यासाठी या कार्यालयाची झाडाझडती घेण्यात आली. सव्वापाच वाजेदरम्यान या दोन्ही आरोपींना बीडकडे घेऊन एसआयटीचे अधिकारी गेले.

तीनही वाहने केज पोलिस ठाण्यातमस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करताना वापरलेली काळ्या रंगाची जीप (एम एच-४४/ झेड-९३३३) तसेच वाल्मीक कराड याला पुणे येथील पाषाण भागातील सीआयडीच्या कार्यालयात घेऊन जाण्यासाठी वापरलेली शिवलिंग मोराळे यांची पांढऱ्या रंगाची जीप (एम. एच.- २३- बी. जी. २२३१) आणि विष्णू चाटे याची पांढऱ्या रंगाची जीप असे तीन वाहन पोलिसांनी जप्त केलेले आहेत. ही वाहने केज पोलिस ठाण्याच्या परिसरात ठेवली आहेत.

टॅग्स :beed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणBeedबीडCrime Newsगुन्हेगारी