शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

तारू गव्हाण बंधाऱ्यासाठी ग्रामस्थांचे गोदापात्रात आंदोलन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 19:51 IST

गोदावरी नदीवरील बंधाऱ्याचे बांधकाम तेरा वर्षांपूर्वी सुरू करण्यात आले आहे.

माजलगाव (बीड ) : तारू गव्हाण येथील गोदावरी नदी वरील बंधाऱ्याचे काम मागील तेरा वर्षापासून प्रलंबित असून अत्यंत धीम्या गतीने काम करण्यात येत आहे. ते काम त्वरित सुरू करून या बंधाऱ्यावरील अवलंबून असणाऱ्या गावकऱ्यांचा पाणी प्रश्न त्वरित सोडविण्यात यावा या मागणीसाठी परिसरातील ग्रामस्थांनी गोदापात्रात लाक्षणिक धरणे आंदोलन केले. 

माजलगाव ,परळी, पाथरी तालुक्यातील पंचेवीस गावच्या सिंचनाचा प्रश्न सोडविण्यासाठी तत्कालिन आघाडी सरकारने पाथरी तालुक्यातील तारूगव्हाण, गोदावरी नदीवरील १२३ कोटी रुपयाच्या बंधाऱ्याचे बांधकाम तेरा वर्षांपूर्वी सुरू करण्यात आले आहे. या बंधाऱ्यातील पाण्याच्या  उपलब्धतेमुळे पाथरी सह माजलगाव तालुक्यातील जवळपास २५ गावांचा पाणी प्रश्न मिटवण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर होते. त्या दृष्टीने या बंधाऱ्याची बांधणी करण्याचे आयोजन होते. परंतु जवळपास १३ वर्षापासून ा बंधार्‍याची बांधणी सुरू करण्यात आली. परंतु गेल्या सात-आठ वर्षांपासून अत्यंत धीम्या गतीने हे काम सुरू आहे. हा बंधारा पूर्ण होऊन परिसरातील शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल या अपेक्षेने जवळपास पंचवीस गावातील शेतकरी वर्ग चातकाप्रमाणे बंधाऱ्याचे बांधकाम पूर्ण होण्याची वाट पाहत आहेत. 

यामुळे गावकऱ्यांनी बंधाऱ्याचे काम त्वरित सुरू करण्यात यावे या मागणीसाठी गोदावरी पात्रातच आज दुपारी लाक्षणिक धरणे आंदोलन केले. जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही.व्ही.नखाते यांनी बंधा-याचे गेट १५ जुलैपर्यंत बसविण्यात येतील असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनात ग्रामस्थ आणि माजी मंत्री प्रकाश सोळंके, धैर्यशील सोळंके, अमित नाटकर, संतोष देशमुख ,अनंतराव डक, बाळासाहेब डाके,अनंतराव नायबळ, गोविंदराव झेटे,अमित नाटकर  आदींची उपस्थिती होती.  

टॅग्स :agitationआंदोलनWaterपाणीgodavariगोदावरी