शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

रेशीम उत्पादकांचे गाव : बीड जिल्ह्यातील सोनीमोहा गावची नवी ओळख

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2017 16:59 IST

रेशीम कोषाला चांगला भाव मिळू लागल्याने ७० ते ८० शेतकर्‍यांनी हा प्रयोग राबविण्यास सुरुवात केली आहे. यामुळे सोनीमोहाची नवीन ओळख रेशीम उत्पादकांचे गाव म्हणून होत आहे.

ठळक मुद्देअनेक वर्षांपासून बाजरी, कापूस, गहू, हरभर्‍याचे उत्पादन घेणारे सोनीमोहा येथील शेतकरी आता रेशीम उत्पादनाकडे वळले आहेत.शेतकरी आता रेशीम कार्यालयाकडून मिळणार्‍या अनुदानाची अपेक्षा न करता लागवड करु लागले आहेत. कमी खर्चात एकरी वर्षभरात दीड ते दोन लाख रुपयांचा फायदा मिळू लागला आहे.

धारुर : अनेक वर्षांपासून बाजरी, कापूस, गहू, हरभर्‍याचे उत्पादन घेणारे शेतकरी आता रेशीम उत्पादनाकडे वळले आहेत. रेशीम कोषाला चांगला भाव मिळू लागल्याने ७० ते ८० शेतकर्‍यांनी हा प्रयोग राबविण्यास सुरुवात केली आहे. यामुळे सोनीमोहाची नवीन ओळख रेशीम उत्पादकांचे गाव म्हणून होत आहे.

अनेक वर्षांपासून बाजरी, कापूस, गहू, हरभरा या पिकांचे उत्पादन घेणारे गाव म्हणून सोनीमोहा प्रसिद्ध होते. पारंपारिक पध्दतीने हंगामानुसार शेतकरी पिके घेत होते. या पिकांचा उत्पादन खर्च व मिळणारा नफा परवडत नसल्याने शेतकरी तीन ते चार वर्षांपासून रेशीम शेतीकडे वळले आहेत. ७० ते ८० शेतकर्‍यांनी शेतात तुती पिकाची लागवड केली आहे. तसेच कीटक संगोपन करण्यासाठी शेड बांधणी केली आहे. रेशीम शेतीपासून चांगल्या प्रकारे कोष निर्मिती सुरु झाली आहे. बेंगलोर येथील रामनगर येथे ५० ते ६० हजार रुपये क्विंटल भाव या कोषांना मिळू लागला आहे. शेतकरी आता रेशीम कार्यालयाकडून मिळणार्‍या अनुदानाची अपेक्षा न करता लागवड करु लागले आहेत. कमी खर्चात एकरी वर्षभरात दीड ते दोन लाख रुपयांचा फायदा मिळू लागला आहे. त्यामुळे इतर पिकांपेक्षा रेशीम शेतीकडे तालुक्यातील शेतकरी वळू लागला आहेत.

अनेकांची ऊसतोडणी थांबलीसोनीमोहा येथील अनेक शेतकरी ऊसतोडणीचा व्यवसाय करतात. काही शेतकर्‍यांनी रेशीम शेती केल्यामुळे त्यांना अधिक पैसे मिळून खर्च भागू लागल्याने त्यांनी ऊसतोडणी बंद केली आहे. रेशीम शेतीत उत्पादन कसे वाढेल यासाठी त्यांचे प्रयत्न मोठ्या प्रमाणावर सुरु आहेत.

रेशम शेती ही फायदेशीर सोनीमोहा परिसर डोंगराळ असून, रेशीम उत्पादनामुळे शेतकर्‍यांना आर्थिक प्रगती साधता आली. इतर पिके न घेता रेशम शेती ही फायदेशीर ठरली. महिन्याकाठी एकरी दीड ते दोन लाख रुपये उत्पादन घेता आले.- सुदामराव साठे, शेतकरी 

प्रशासनाचे मार्गदर्शन मिळते कमी मेहनतीत वेळोवेळी मशागत करुन रेशीमचे चांगले उत्पादन घेतले. प्रशासनानेही आमच्याबरोबर गावातील इतर शेतकर्‍यांना मार्गदर्शन करून या शेतीकडे वळवले. यामुळे गावातील शेतकर्‍यांना मोठी मदत होत आहे.- कोंडिंबा तोंडे, शेतकरी 

रेशीम शेतीचे प्रशिक्षण सुरु केले सोनीमोहा येथील रेशीम शेती करणार्‍यांना एमआरएजीएस मधून लाभ देत प्रोत्साहन देण्याचे काम केले. तसेच तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबियांना शेतीचे प्रशिक्षण देत त्यांना याकडे आकर्षित करण्याचे प्रयत्न प्रशासनाच्या वतीने सुरु आहेत.- राजाभाऊ कदम, तहसीलदार

टॅग्स :FarmerशेतकरीBeedबीड