शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
2
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
3
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
4
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
5
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
6
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
7
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
8
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
9
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
10
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
11
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
12
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
13
जेएनपीए चॅनलच्या भ्रष्टाचारात आणखी अधिकारी अडकणार? वाढवण बंदराचे संचालक पदही जाणार?
14
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
15
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
16
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
17
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
18
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
19
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
20
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी

Video: पुलावरून पाणी वाहतंय अन् पठ्याने बाईक घातली, जीवावर बेतले होते पण... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2022 15:12 IST

सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास शहरासह विविध भागात जोरदार पाऊस झाल्याने नदी, ओढेनाल्यांना मोठ्या प्रमाणावर पाणी आले होते.

गेवराई (बीड) : परतीच्या पावसाने तालुक्यात धुमाकुळ घातला आहे. मंगळवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास शहरासह तालुक्यातील विविध भागात जोरदार पाऊस झाल्याने पांढरवाडी जवळील ओढ्याच्या पुलावरून पाणी वाहत होते. एकाने त्यात दुचाकी नेली. मात्र, प्रवाह जास्त असल्याने तो गाडीसह वाहून गेला. कसेबसे काठावर आलेल्या या व्यक्तिला नंतर नागरिकांनी बाहेर काढले. 

उमर वजिर सय्यद ( ४५, हिरडपुरी, पैठण, हल्ली मुक्काम चिकलठाणा औरंगाबाद ) असे थोडक्यात बचावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. उमर मंगळवारी औरंगाबादहून तालुक्यातील खळेगावं येथील नातेवाईकांना भेटण्यासाठी निघाला होता. दरम्यान, सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास शहरासह विविध भागात जोरदार पाऊस झाल्याने नदी, ओढेनाल्यांना मोठ्या प्रमाणावर पाणी आले होते. शहराजवळ असलेल्या पांढरवाडी ओढ्याला या पावसाने मोठ्या प्रमाणात पाणी आले होते. पाणी पुलावरून वाहत असल्याने दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती. 

कसाबसा गाठला काठ पुलाच्या अलीकडेच नागरिक थांबलेले दिसत असताना उमर यांनी अतिधाडस करत पुरातून गाडी घातली. मात्र, प्रवाहाचा वेग जास्त असल्याने गाडीसह उमर वाहून गेले. कसेबसे काठ गाठल्यानंतर नागरीकांनी त्यांना बाहेर काढले. तो वाचला पण दुचाकी पाण्यात वाहून केली असून अद्याप शोध लागला नाही. नागरिकांनी वाहत्या पाण्यातून दुचाकी किंवा पाण्यात जाऊ नये, असे आवाहन तहसीलदार सचिन खाडे यांनी केले आहे.

टॅग्स :RainपाऊसBeedबीडAurangabadऔरंगाबाद