शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

Video: जमिनीतून निघाला धूर आणि लाव्हासदृश उकळता खडक, बीडमध्ये खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 19:30 IST

मोकळ्या मैदानात जमिनीतून अचानक धूर आणि लाव्हा बाहेर आल्याने खळबळ

- गणेश देशमुख

सिरसाळा (बीड ) : सिरसाळा-मोहा रस्त्यावर असणाऱ्या मोकळ्या मैदानात जमिनीतून अचानक धूर आणि लाव्हा सदृश्य उकळता खडक बाहेर येऊ लागल्याने एकच खळबळ उडाली. हा प्रकार शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता समोर आला. आज दिवसभर हा भाग शांत होता. मात्र या ठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी दिसून आली.

सिरसाळा येथे मोहा रस्त्यावर नवीन वस्ती तयार झाली आहे. या वस्तीसमोर एक मोकळे मैदान आहे. मैदानातून उच्चदाब विद्युत वाहिनी गेली आहे. यातील एका खांबाजवळील जागेतून शुक्रवारी सायंकाळी धूर आणि उकळत्या खडकाच्या बुडबुड्या फुटत असल्याचे काही नागरिकांना निदर्शनास आले. काही वेळातच जमिनीतून लाव्हा निघत असल्याची अफवा सोशल मिडीयावर व्हायरल झाली आणि येथे बघ्यांची गर्दी वाढली. याची माहिती मिळताच सिरसाळा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या भागात नव्याने वस्तीस आलेल्या नागरिकांनाया प्रकारामुळे घाम फुटला आहे. हे कशामुळे घडले हे कोड  मात्र अद्याप अनुत्तरीत आहे. 

वीज प्रवाह बंद करताच शांतता या प्रकाराची माहिती वीजवितरणच्या कर्मचाऱ्यांना मिळाली. त्यांनी घटनास्थळीवरील उच्चदाब विद्युत वाहिनीचा विद्युत प्रवाh बंद करताच या ज्वाला बंद झाल्या. याबाबतच्या माहितीसाठी येथील महावितरण चे कनिष्ठ अभियंता नामदेव सुतार यांच्याशी संपर्क व्होऊ शकला नाही. 

लाव्हाचा प्रकार नाही याबाबत येथील तलाठी युवराज सोळंके यांच्याशी संपर्क साधला असता, हा प्रकार लाव्हाचा नसल्याचे सांगितले. प्राथमिक माहितीनुसार विजेच्या खांबातून विज प्रवाह उतरल्या मुळे हा प्रकार झाला असावा असा दावा त्यांनी केला असून आम्ही याबाबत सतर्क असल्याचे ते म्हणाले. 

पहा व्हिडिओ :

टॅग्स :Earthपृथ्वीBeedबीडelectricityवीज