शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

Video : तिरंग्यात लपेटलेलं पार्थिव पाहून आईनं टाहो फोडला, शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2020 1:31 PM

शहीद महेश तिडके यांचे वडील सैन्यात होते, ते सेवानिवृत्त झाले आहेत

नृसिंह सुर्यवंशी 

बीड - जिल्ह्यातील लाडझरी ता. परळी वै. येथील शहीद सैनिक महेश यशवंत तिडके (वय २३) यांच्यावर अतिशय शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात सकाळी ९-३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. महेश तिडके हे भटींडा पंजाब येथे सैन्यात टेक्नीशीयन या पदावर कार्यरत होते. ड्युटी संपवून कॉर्टरला घरी मोटारसायकलवरून परतत असताना १९ डिसेंबर रोजी दाट धुक्यात कारने धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्यांना सैन्याच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र, २७ डिसेंबर रोजी ते कोमात गेले व अखेर 30 डिसेंबर रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. 

महेश हे २०१६ मध्ये सैन्यात भरती झाले होते. अंत्यसंस्कारापूर्वी शहीद महेश यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी जि.प. शाळेच्या प्रांगणात ठेवण्यात आले होते. त्याठिकाणी अलोट गर्दी उसळली होती.

सैन्याचे बाळकडु घरातूनच

शहीद महेश तिडके यांचे वडील सैन्यात होते, ते सेवानिवृत्त झाले आहेत. तर त्यांचे मोठे बंधू राहुल यशवंत तिडके हेही सैन्यात असून ते श्रीनगर येथे कार्यरत आहेत. घरातील सैनिकांची पार्श्वभूमी पाहता महेश यांनी आर्मीत भरती होण्यासाठी कठोर मेहनत घेतली होती. दहावीनंतर पॉलीटेक्नीक करून ते सैन्यात भरती झाले होते. महेश यांच्या निधनाचे वृत्त समजताच राज्याचे मंत्री ना धनंजय मुंडे यांनी शोकसंदेश पाठवून आपल्या संवेदना प्रकट केल्या. शासनाच्या वतीने उपजिल्हाधिकारी गणेश महाडीक, परळीचे तहसिलदार पाटील, गटविकास अधिकारी संजय केंद्रे, तलाठी रेश्मा गुणाले, ग्रामसेवक ज्ञानेश्वर मुकाडे, यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली अर्पण केली. माजी मंत्री पंडीतराव दौंड, परळी प स सभापती बबनराव गित्ते, शिवाजी गुट्टे यांनी अंत्यदर्शन घेवून संवेदना व्यक्त केल्या.

शहीद महेश तिडके यांचे आठ महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. त्यांची सासुरवाडी मैंदवाडी ता. परळी वै असून त्यांच्या पश्चात पत्नी, आई वडील भाऊ असा परिवार आहे. या घटनेनं लाडझरी, मैंदवाडी या दोन्ही गावावर शोककळा पसरली आहे. अंत्यसंस्कारापूर्वी अहमदनगर येथून आलेल्या सैनिकांनी हवेत फैरी झाडून मानवंदना दिली. अतिशय भावविभोर वातावरणात अमर रहे च्या घोषणात शहीद महेश यांना अखेरचा निरोप देण्यात आला.  

टॅग्स :MartyrशहीदPunjabपंजाबparli-acपरळीIndian Armyभारतीय जवान