शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

Video: 'हर हर महादेव'च्या जयघोषात भाविकांनी घेतले वैद्यनाथाचे मनोभावे दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2022 11:53 IST

Vaidyanatha Temple: बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्रभु वैद्यनाथाच्या दर्शनासाठी मंदिरात मध्यरात्री बारा वाजल्यापासूनच भाविकांनी गर्दी केली होती.

- संजय खाकरे परळी (बीड): हर हर महादेव, प्रभू वैद्यनाथ भगवान की जय, असा जयघोष करत हजारो शिवभक्तानी श्री प्रभुवैद्यनाथाचे पहिल्या श्रावण सोमवारानिमित्त मनोभावे दर्शन घेतले. महिलांनी तांदूळ शिवामूठ वाहून व बिल्वपत्र वैद्यनाथास अर्पण करून दर्शन घेतले. देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्रभु वैद्यनाथाच्या दर्शनासाठी (Vaidyanatha Temple) मंदिरात मध्यरात्री बारा वाजल्यापासूनच भाविकांनी गर्दी केली होती. सकाळी या गर्दीत वाढ झाली.

हजारो भाविकांचे दर्शन घेणे सुलभ व्हावे यासाठी श्री वैजनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने वैद्यनाथ मंदिराच्या पायऱ्यावर लोखंडी बॅरिकेट्स लावण्यात आले. या बॅरिकेट्स मधून भाविकांनी मंदिरात पूर्वेच्या दरवाजाने जाऊन दर्शन घेतले मंदिरामध्ये वॉटरप्रूफ मंडप टाकण्यात आला होता. पहिला श्रावणसमोर असल्याने राज्य व परराज्यातून शिवभक्त परळीत दर्शनासाठी आले. वैद्यनाथ मंदिरात रात्री बारा वाजल्यापासूनच भाविकांची दर्शनासाठी झुंबड उडाली होती. सकाळी आठ वाजेच्यानंतर या गर्दीत वाढ झाली. 

पोलीस प्रशासनच्या वतीने मंदिर परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यामुळे हजारो भक्तांनी शिस्तीत उभे राहून वैजनाथाचे दर्शन घेतले. प्रसाद साहित्य, पेढे विक्रेते, बिल्वपत्र घेण्यासाठी या ठिकाणीही भाविकांची गर्दी झाली. वैद्यनाथ मंदिर परिसर भाविकांच्या संख्येने फुलून गेला आहे. वैद्यनाथ मंदिरात महिला, पुरुष व पास धारकांची स्वतंत्र रांग लावण्यात आली आशी माहिती श्री वैद्यनाथ मंदिर ट्रस्टचे सचिव राजेश देशमुख यांनी दिली. रविवारी रात्री शिव कावड पदयात्रा लातूरहून परळीस आली. हरहर महादेवचा जयघोष करत पदयात्रेतील भाविकांनी वैद्यनाथ मंदिराच्यासमोर आनंदत व्यक्त केला. 

गंगेचे पाणी आणण्याची परंपराश्रावण महिनाभर वाणी संगम येथून गंगेचे पाणी प्रभू वैद्यनाथास कावडद्वारे आणून प्रभू वैद्यनाथास वाहण्याची नाथरा येथील मुंडे, सोनपेठ येथील महाजन कुटुंबांची पिढ्यान पिढ्याची परंपरा आज ही कायम आहे. नाथरा येथील मुंडे कुटुंबातील धनंजय पंडितराव मुंडे यांच्या कावडीतून गंगेचे पाणी नरहरी मुंडलिक, गोरख गित्ते तर सोनपेठ येथील शिवाजीअप्पा महाजन यांच्या कुटुंबातील शैलेश शिवाजी महाजन यांची कावड सदाशिव व्यंकटी चांगिरे श्रावणात वैद्यनाथ मंदिरात आणतात व कावडीतील गंगेचे पाणी श्री वैद्यनाथाला वाहतात. तसेच परळी तालुक्यातील खेड्यातून अनेक भाविक गंगेचे पाणी श्री वैद्यनाथाला वाहतात. 

टॅग्स :Shravan Specialश्रावण स्पेशलBeedबीड