शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Video: शेतकऱ्याने आता काय करावे? पुराच्या पाण्यात डोळ्यादेखत ४ हजार कोंबड्या वाहून गेल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2022 19:58 IST

आष्टी तालुक्यातील सोलेवाडी येथील शेतकऱ्याचे ८ लाखांचे नुकसान 

- नितीन कांबळे कडा (बीड) : सोलेवाडी येथील शिवारात पुराचे पाणी थेट शेडमध्ये घुसल्याने त्यातील ४ हजार कोंबड्यांसह खाद्य वाहून गेल्याची घटना आज सकाळी घडली. यामुळे शेतकऱ्याचे जवळपास ८ लाखांचे लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.  अचानक ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यादेखत मोठ्या मेहनतीने उभारलेली पोल्ट्री होत्याची नव्हती झाली.

आष्टी तालुक्यातील सोलेवाडी सह परिसरात गुरुवारी परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने नदीला मोठ्या प्रमाणावर पाणी आले. नदीपासून काही अंतरावर खंडु झगडे यांचे कोंबड्याचे दोन शेड होते. यात पुराचे पाणी शिरल्याने ४ हजार कोंबड्यासह ११० खाद्य गोण्या वाहून गेल्या. जोरदार पावसाने शेतकऱ्याच्या डोळ्यासमोर मोठे आर्थिक नुकसान झाले. 

शेतकऱ्याने काय करावे? ढगफुटी सदृश्य पावसाने सारेच उद्ध्वस्त झाले. ७० दिवसाचे झालेले चार हजार पिले व खुराक डोळ्यासमोर वाहुन गेल्याने शेतकरी झगडे हवालदिल झाले आहेत. दरम्यान, पावसात झगडे यांनी प्रयत्न केल्याने काही पिले वाचविण्यात यश आले आहे. शासनाने पंचनामा करून आर्थिक उभारी देण्यासाठी अर्थसाह्य करावे अशी मागणी खंडु झगडे यांनी केली आहे.

टॅग्स :RainपाऊसBeedबीडFarmerशेतकरी