स्वच्छतेची मागणी
बीड : शहरातील अनेक ठिकाणी तसेच सहयोगनगर, स्टेडियम कॉम्प्लेक्स परिसरात कचरा रस्त्यावरच टाकला जात आहे. यामुळे दुर्गंधी वाढली आहे. पालिकेतर्फे नियमित सफाई केली जात नसल्याने यात आणखी भर पडत आहे.
गतिरोधकाची दुरवस्था
बीड : शहरातील मुख्य भागातील रस्त्यावर ठिकठिकाणी असलेले गतिरोधक दुुरुस्तीला आले आहेत. गतिरोधक खराब झाल्याने गतीला आवरणे कठीण झाले आहे. यामुळे शहरात नव्याने गतिरोधक तयार करण्याची मागणी होत आहे.
श्वानांचा त्रास वाढला
बीड : शहरातील अनेक भागांत भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे. हे भटके कुत्रे टोळक्याने बसत असल्याने रात्रीच्या वेळेस हे कुत्रे दिसून येत नसल्याने हल्ला चढवत आहेत. यामुळे अनेक नागरिक जखमी झाले आहेत.
पिकांवर प्रादुर्भाव
बीड : जिल्ह्यातील अनेक तालुक्यात सध्या रबी पिके बहरू लागली आहेत. परंतु, बदलत्या वातावरणामुळे परिणामी या पिकांवर किडीचा प्रादुर्भाव दिसत आहे.