शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
2
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
3
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
4
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
5
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
6
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
7
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
8
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
9
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
10
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
11
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
12
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
13
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
14
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
15
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
16
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
17
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
18
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
19
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
20
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
Daily Top 2Weekly Top 5

आष्टी तालुक्यातील वीर जवान शरद चांदगुडे अनंतात विलीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 13:28 IST

सोमवार दि.१८ जानेवारी रोजी अपघातात ते गंभीर जखमी झाले होते.

आष्टी : तालुक्यातील लोणी सय्यदमीर येथील वीर जवान शरद दत्तोबा चांदगुडे हे एक महिन्याच्या सुट्टीवर आपल्या लोणी सय्यदमीर या गावी आले होते. सोमवार दि.१८ जानेवारी रोजी रात्री ९ च्या सुमारास मोटारसायकल घेऊन बाहेर जात असताना रस्त्याच्या बाजूला असलेल्या वृक्षाला धडकल्याने त्यांच्या डोक्याला मार लागला होता. उपचारादरम्यान त्यांचा शुक्रवार दि.२२ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता मृत्यू झाला. त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात लोणी सय्यदमीर येथे शनिवार दि .२३ जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.

शरद चांदगुडे हे २००४ मध्ये अहमदनगर येथे फौजमध्ये भरती झाले होते. भरती झाल्यानंतर त्यांनी जम्मू, राजस्थान, बेळगाव, पंजाब येथे आपले कर्तव्य निभावले होते. शरद चांदगुडे हे एक महिन्याच्या सुट्टीवर गावी आले होते. सोमवारी (ता.१८) उशिरा काही कामानिमित्ताने ते दुचाकी घेऊन बाहेर जात असताना अंधार असल्याने रस्त्याच्या बाजूच्या वृक्षाला धडक बसली होती. यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांना प्रथम अहमदनगर व नंतर पुणे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना शुक्रवारी (ता.२२) सायंकाळी ५ वाजता त्यांचे निधन झाले. त्यांच्यावर शनिवारी (२३) सायंकाळी ७ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. वीर जवान शरद चांदगुडे यांना आई, वडील, पत्नी, दोन मुले व दोन भाऊ असा परिवार आहे.

शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आ बाळासाहेब आजबे, माजी आ साहेबराव दरेकर, तहसिलदार शारदा दळवी, जयदत्त धस, सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे, आर्मीचे अधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.शरद चांदगुडे यांचा भाऊ बाळासाहेब चांदगुडे हे पण आर्मीमध्ये कायरत आहेत.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :Beedबीड