कडा (जि. बीड): येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत मंगळवारी मध्यरात्री एका अज्ञात व्यक्तीने शिरून धुमाकूळ घातला. या व्यक्तीने आपली ओळख लपवण्यासाठी डोक्यात पिशवी घातली होती. शाळेतील तब्बल आठ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड करत चार वर्गखोल्यांची कुलपे फोडल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी सकाळी उघडकीस आला आहे.
शासकीय मालमत्तेचे नुकसानमिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास या अज्ञाताने शाळेत प्रवेश केला. बाहेरील आणि वर्गखोल्यातील कॅमेरे फोडून त्याने शासकीय मालमत्तेचे मोठे नुकसान केले. बुधवारी सकाळी शिपाई शाळेत आल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. मुख्याध्यापक उद्धव सोनवणे यांनी शाळा व्यवस्थापन समितीला याची माहिती दिली. त्यानंतर आष्टी पोलीस ठाण्याचे हवालदार भाऊसाहेब आहेर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
पुन्हा पुन्हा त्याच शाळेवर हल्ला?विशेष म्हणजे, दोन वर्षांपूर्वीही याच शाळेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड करून टीव्ही चोरीला गेल्याची घटना घडली होती. वारंवार घडणाऱ्या या प्रकारामुळे पालकांमध्ये आणि शिक्षणप्रेमींमध्ये संताप व्यक्त होत आहे. या समाजकंटकाचा उद्देश काय आहे, याचा शोध घेणे आता पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. मुख्याध्यापकांच्या तक्रारीवरून आष्टी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
Web Summary : A masked individual vandalized a school in Kada, Beed, destroying eight CCTV cameras and breaking into classrooms. This incident follows a previous theft, raising concerns among parents and educators. Police are investigating the motive behind the repeated attacks.
Web Summary : बीड के कड़ा में एक नकाबपोश व्यक्ति ने एक स्कूल में तोड़फोड़ की, आठ सीसीटीवी कैमरे नष्ट कर दिए और कक्षाओं में तोड़फोड़ की। यह घटना पिछली चोरी के बाद हुई है, जिससे माता-पिता और शिक्षकों में चिंता है। पुलिस बार-बार हमलों के पीछे के मकसद की जांच कर रही है।