शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वाल्मीक कराडचा मावस भाऊ विष्णू चाटेला हवी होती बंदूक; केला होता परवान्यासाठी अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 16:32 IST

खंडणी प्रकरणाच्या आधी केला होता अर्ज

बीड : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड याचा मावस भाऊ आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचा माजी केज तालुकाध्यक्ष विष्णू चाटे याने खंडणी मागण्याआधीच बंदूक परवान्यासाठी अर्ज केला होता. आरोपींशी चहा-पान करणाऱ्या केज पोलिसांनीही यात तत्परता दाखवीत तो अवघ्या ७५ दिवसांत सर्व प्रक्रिया पूर्ण करून तो पोलिस अधीक्षक कार्यालयातही पाठविला; परंतु त्यानंतर देशमुख यांचा खून झाला. जानेवारी महिन्यात पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी यावर हरकत नोंदवीत तो जिल्हाधिकाऱ्यांना पाठविला. चाटेला परवाना देऊ नये, असे पोलिसांनी स्पष्ट लिहिल्याचे समाेर आले आहे.

सुनील केदू शिंदे (वय ४२, रा. नाशिक, ह. मु. बीड) हे अवादा एनर्जी प्रा. लि. या कंपनीच्या मस्साजोग येथील पवन ऊर्जा प्रकल्पामध्ये प्रकल्प अधिकारी म्हणून काम पाहतात. त्यांना २८ ऑगस्ट २०२४ रोजी पहिल्यांदा वाल्मीक कराड याने फोनवरून खंडणी मागितली. त्यानंतर ११ सप्टेंबर २०२४, ८ ऑक्टोबर २०२४, २६ नोव्हेंबर २०२४ आणि २९ नोव्हेंबर २०२४ रोजी दोन वेळा दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली. ती न दिल्यानेच ६ डिसेंबर २०२४ रोजी वाल्मीक कराड व विष्णू चाटे याच्या सांगण्यावरून सुदर्शन घुले व त्याची टोळी मस्साजोगला गेली. तेथे गोंधळ घालत असताना सरपंच संतोष देशमुख मदतीला आले. आपल्या खंडणीत अडथळा ठरत असल्यानेच कराड व त्याच्या टोळीने ९ डिसेंबर २०२४ रोजी देशमुख यांची अपहरण करून हत्या केली.

कधी केला अर्ज ?जुलै २०२४ मध्ये अर्ज केला. तो तपासणीसाठी बीड पोलिसांकडे आला. त्यानंतर ऑगस्ट २०२४ रोजी केज पोलिस ठाण्याने सर्व तपासणी करून उपविभागीय पोलिस अधिकारी केज यांना पाठविला. सप्टेंबर २०२४ मध्ये पोलिस अधीक्षक कार्यालयात हा प्रस्ताव आला. जानेवारी २०२५ रोजी पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी हा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविला. त्यात त्यांनी विष्णू चाटे याला परवाना देण्याबाबत हरकत नोंदवली होती.

का नोंदवली हरकत?चाटे याने अर्ज दाखल केला तेव्हा त्याच्यावर गुन्हा नोंद नव्हता, असे केज पोलिसांनी कळवले; परंतु पोलिस अधीक्षकांकडून जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव पाठविताना चाटे विरोधात सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि खंडणी असे दोन गुन्हे नोंद झाले होते. हाच धागा पकडून चाटे याला बंदूक परवाना देण्यात येऊ नये, असे लिहून हा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना पाठविला होता, असे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Beed Crimeबीड क्राईम मराठी बातम्याbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणSantosh Deshmukhसंतोष देशमुख हत्या प्रकरणBeedबीड