शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

वाल्मीक कराडचा न्यारा थाट, १५ गुन्हे तरीही शस्त्र परवाना; पोलिसांच्या पत्रानंतरही जिल्ह्याधिकाऱ्यांनी केली नाही कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 07:01 IST

...एवढेच नव्हे तर गुन्हा दाखल होईपर्यंत दोन पोलिस बॉडीगार्डही होते. त्यामुळे पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे. तर दुसऱ्या बाजूला पोलिसांनी यादी पत्र दिल्यानंतरही जिल्हाधिकाऱ्यांनी त्यावर कारवाई केली नाही.

बीड : मस्साजोग येथे पवनचक्कीचे काम करणाऱ्या अधिकाऱ्याकडे दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या गुन्ह्यातील आरोपी वाल्मीक कराडवर एक-दोन नव्हे तर तब्बल १५ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. असे असतानाही त्याच्याकडे शस्त्र परवाना होता. एवढेच नव्हे तर गुन्हा दाखल होईपर्यंत दोन पोलिस बॉडीगार्डही होते. त्यामुळे पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे. तर दुसऱ्या बाजूला पोलिसांनी यादी पत्र दिल्यानंतरही जिल्हाधिकाऱ्यांनी त्यावर कारवाई केली नाही.

केज तालुक्यातील मस्साजाेगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण राज्यभर गाजले आहे. याच गुन्ह्यातील सुदर्शन घुले आणि विष्णू चाटे या दोन आरोपींच्या समवेत मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असलेल्या वाल्मीक कराड याने पवनचक्कीचे काम करणाऱ्या आवादा कंपनीच्या अधिकाऱ्याकडे दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. यात आतापर्यंत केवळ चाटे अटकेत आहे. अजूनही कराड आणि घुले मोकाटच आहेत. सीआयडीकडून फरार आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना केल्याचे सांगण्यात येत आहे. 

विषय गाजल्यावर आता नोटीसेस कराड याला पोलिसांचे दोन बॉडीगार्ड होते. तसेच त्याला शस्त्र परवानाही होता. ऑक्टोबर २०२४ मध्ये तत्कालीन पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी गुन्हे दाखल असलेल्या २४५ जणांची यादी जिल्हाधिकाऱ्यांना दिली होती. यात कराडचेही नावे होते. परंतु, जिल्हाधिकाऱ्यांनी यावर काहीच कारवाई केली नाही. आता विषय गाजल्यावर नोटीस बजावल्या आहेत.

गुन्हा दाखल, तरी सोबत बॉडीगार्ड ११ डिसेंबर रोजी कराडविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल झाला. १३ डिसेंबर रोजी तो मध्य प्रदेशमधील उज्जैनला असल्याची पोस्ट सोशल मीडियावर आहे. यावेळी सोबत पोलिस बॉडीगार्डही आहे. मग तेव्हाच त्याला अटक का केली नाही? असा सवाल उपस्थित होत आहे.

फडणवीस बीडचे पालकमंत्री व्हावेत : आमदार धस जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राहिली नाही, केमिकलयुक्त ताडी विक्री होत आहे. जिल्ह्यात अगदी सहजपणे शस्त्र परवाना दिला असून, परळी तालुक्यात रात्रीच्या वेळी ३०० पेक्षा अधिक टिप्पर गुंडांच्या मदतीने चालतात. अशा परिस्थितीमुळे विशेष बाब म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री झाले पाहिजेत, असे मत भाजप आमदार सुरेश धस यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.  

धनंजय देशमुख यांची हायकोर्टात धावमस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण आणि हत्येच्या तपासाबाबत पोलिसांना योग्य निर्देश द्यावेत, खंडणीच्या गुन्ह्याचा मास्टरमाइंड आरोपी वाल्मीक कराड याचे मंत्री धनंजय मुंडेंसोबत असलेले राजकीय लागेबांधे पाहता या घटनेचा तपास निष्पक्ष होण्यासाठी योग्य त्या कारवाईचे निर्देश पोलिस प्रमुख आणि राज्याच्या गृहसचिवांना द्यावेत, अशी मागणी करणारी क्रिमिनल याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली आहे.  मृत संतोष देशमुख यांचे धाकटे बंधू धनंजय देशमुख यांनी ॲड. शोमितकुमार व्ही. साळुंके यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली. 

 अपहरण आणि हत्या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत मुंडे यांना मंत्रिपदापासून दूर ठेवण्याबाबतचा आदेश देण्याची विनंती याचिकेत करण्यात आली आहे.

धस, दमानिया यांनी घेतली एसपींची भेटभाजपचे आ. सुरेश धस यांनी आधी जिल्हाधिकारी आणि नंतर पोलिस अधीक्षकांची भेट घेतली. तसेच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही पोलिस अधीक्षकांची भेट घेतली. फरार आरोपींचे मृतदेह सापडल्याच्या फेक मेसेजसंदर्भात चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आतापर्यंत गोळीबार, पवनचक्कीच्या वादातून घडलेले गुन्हे, वाल्मीक कराडचा बॉडीगार्ड आदींची माहिती मागविल्याचे दमानिया म्हणाल्या.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसcollectorजिल्हाधिकारी