शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बीड जिल्ह्यातील डोंगराला पाच शतकांनंतर मिळाले वैभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 00:52 IST

शिरूर कासार तालुक्यातील बीड- पाथर्डी मार्गावर रायमोह- खोकरमोहाच्या मध्यावर रस्त्यालगत किमान पाच शतकांपूर्वी रायमोहाच्या किल्ल्यावरून झालेल्या तोफांच्या माराने डोंगरावरील मंदिर भग्न झाले होते. या मंदिराचा जीर्णोद्धार होत असून, आता त्याचा प्रति मोहटादेवी असा नावलौकिक निर्माण होत आहे.

विजयकुमार गाडेकर ।लोकमत न्यूज नेटवर्कशिरूर कासार : तालुक्यातील बीड- पाथर्डी मार्गावर रायमोह- खोकरमोहाच्या मध्यावर रस्त्यालगत किमान पाच शतकांपूर्वी रायमोहाच्या किल्ल्यावरून झालेल्या तोफांच्या माराने डोंगरावरील मंदिर भग्न झाले होते. या मंदिराचा जीर्णोद्धार होत असून, आता त्याचा प्रति मोहटादेवी असा नावलौकिक निर्माण होत आहे.रायमोहाजवळ डोंगराच्या माथ्यावर दुुर्लक्षित मंदिराचा उर्जितकाळ सुरू झाला आहे. या पाच वर्षांत मंदिर परिसरात मोठा लक्षवेधी बदल दिसत आहे. लोकसहभागातून दीड कोटी रुपये खर्चून लाल दगडाचे मंदिर जोमाने उभारणीचे काम वेगात आहे. दुर्गम टेकडीमुळे मोठे आव्हान होते; परंतु दुर्दम्य इच्छाशक्ती व देवीच्या प्रबळ आशीर्वादाच्या जोरावर हे काम पूर्णत्वाकडे जात आहे.

राजस्थानातील बन्सीपहाडपूरचा लाल दगड वापरून मध्यप्रदेश, ओडिशाचे कारागीर अत्यंत कलाकुसरीचे मंदिराचे काम करत आहेत. सहा वर्षांपूर्वी २९ डिसेंबर रोजी मंदिर कामास सुरुवात झाली. वेगाने होणाऱ्या कामाकडे अनेकांचे लक्ष गेले व योगदानात वाढ होत गेली. मंदीर उभारणी सुरू असताना पायथ्याजवळून परळी-बीड-अहमदनगर रेल्वेमार्गाचे काम सुरू होते. निघालेले दगड मुरूम टाकण्यासाठी जागेच्या शोधात रेल्वेचे गुत्तेदार होते. यासाठी मंदिर परिसराची जागा मिळाली.मंदीर परिसरातील जागेचे सपाटीकरण करण्यासाठी रेल्वेची मोठी मदतच झाली. रोज किमान दीडशे ते दोनशे टिप्पर माल पडत असून, आतापर्यत किमान ५५ हजार खेपा मंदिराभोवती पडल्याने जवळपास एक कि.मी. गोलाकार क्षेत्र विस्तार झाला आहे.

या कामाची पैशात किंमत काढल्यास ती तब्बल अकरा कोटीच्या घरात जाते. जमिनीपासून ११०० फूट उंचावर असलेल्या मंदिराभोवती गोलाकार २०० फूट रुंदीच्या प्रशस्त जागेचीही उपलब्धता झाली आहे.

तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश तांदळे पंचक्रोशीतील भाविकांसोबत हे काम करत आहे. देवीची प्रेरणाच यासाठी पाठबळ देत असून, सर्वांची मदत आहे. हे ठिकाण जागृत असल्यामुळे कामात अडचण येत नाही, अशी प्रतिक्रिया डॉ. तांदळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.प्रतिमोहटादेवी मंदिरडोंगर जगदंबा मंदिर हे लवकरच प्रतिमोहटा म्हणून ओळखले जाईल. मोहट्याला आलेला प्रत्येक भाविक इथे आल्याशिवाय राहाणार नाही. तालुक्यातील धर्मपीठात डोंगर जगदंबा देवी मंदिर हे भाविकांसाठी एक मोठे आकर्षण राहणार आहे.भाविकांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेतली जाईल.

टॅग्स :BeedबीडMarathwadaमराठवाडाTempleमंदिर