शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यक्रमासाठी चोरून विजेचा वापर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2024 21:51 IST

काय कारवाई होणार? याकडे मतदारसंघातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. 

माजलगाव - उपमुख्यमंत्री अजित पवार यांची 'जनसन्मान' यात्रा मंगळवारी शहरात येणार असून, त्यासाठी कार्यक्रमस्थळी चोरून विज घेण्यात आल्याचे समोर आले आहे. उपमुख्यमंत्र्याच्या कार्यक्रमाला परवानगी न घेताच वीज वापर होत असल्यामुळे यांच्यावर काय कारवाई होणार? याकडे मतदारसंघातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. 

मागील अनेक दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जल सन्मान यात्रा महाराष्ट्रभर फिरून मंगळवारी याचा परळी येथे समारोप होणार आहे. त्यापूर्वी सकाळी 11 वाजता मंगलनाथ मैदानामध्ये या यात्रेनिमित्त भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सभास्थळी मागील चार दिवसांपासून भव्य अशा मंडपाची उभारणीचे काम सुरू आहे. तेव्हापासून जवळच असलेल्या एका रोहीञावरून डायरेक्ट आकडे टाकून विजेचा वापर सुरू आहे. यासाठी संबंधित मंडप उभारणी वाल्यांनी वीज वितरण कंपनीकडून यासाठी कसल्याच प्रकारची परवानगी घेतली नसल्याचे देखील सांगण्यात येत आहे.

सोमवारी संध्याकाळी सात वाजेपर्यंत हे आकडे तसेच दिसून येत होते. तीन दिवसांपूर्वी वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी जाऊन विचारणा केली असता आम्ही जनरेटर लावून असल्याचे सांगितले होते. परंतु 3-4 दिवसांपासून या ठिकाणी आकडे टाकून विच चोरी करण्यात येत आहे. असा प्रकार कोणी सर्वसामान्यांनी केला असता तर वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई केली असती. परंतु हा प्रकार वीज वितरण कंपनीचे अधिकाऱ्यांना माहीत असताना देखील त्यांनी अद्याप कारवाई केली नसल्यामुळे या अधिकाऱ्यांची वीज चोरीसाठी मुख संमती तर नाही ना असा प्रश्न देखील उपस्थित होऊ लागला आहे. मुख्य रस्त्यावर विनापरवाना होर्डींग्ज 

या जनसन्मान यात्रेसाठी शहरात जागोजागी होर्डींग्ज लावण्यात आले आहेत. यामुळे शहराचे विद्रुपीकरण पाहावयास मिळत होते. न्यायालयाने कोठेही होर्डींग्ज लावण्यास मनाई केलेली असताना व नगरपालिकेची कसल्याच प्रकारची परवानगी न घेता हे होर्डींग्ज लावले असल्याचे नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले. यामुळे उपमुख्यमंत्र्याच्या कार्यक्रमाला  परवानगीची आवश्यकता नाही का असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे. शहरात होणारे जनसन्मान यात्रेसाठी वीज वितरण कंपनीकडून तात्पुरत्या मीटर साठी परवानगी घेण्यात आलेली नाही. दोन दिवसापूर्वी आम्ही जाऊन पाहणी केली असता डीपी वरून फक्त फोकस साठी लाईट घेण्यात आली होती. कार्यक्रमावेळी जनरेटर चा वापर करणार असल्याचे या ठिकाणी काम करणाऱ्या व्यक्तीने सांगितले होते. कल्पना सांगोलकर , कनिष्ठ अभियंता, विज वितरण कंपनी माजलगाव शहर

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारmajalgaon-acमाजलगांव