बीड : भारतीय सैन्य दलाच्या वतीने बीडसह पुणे, अहमदनगर, उस्मानाबाद, लातूर या पाच जिल्ह्यातील तरुणांसाठी ४ फेब्रुवारी रात्री ११ पासून पासून भरती प्रक्रिया सुरु होणार असल्याने मंगळवारी सकाळपासून तरूणांचे जथे सैनिकी विद्यालयाच्या परिसरात पहायला मिळाले.लूट रोखण्याची गरजभरती परिसरात कापडी मंडप टाकून काहींनी हॉटेल व्यवसाय सुरु केला, तर काहीजण गाड्यावर खाद्यपदार्थ, फळे विक्री करत आहेत. मात्र वडापाव , भाजी, अंडी, पाण्याची बाटली महागड्या दराने घ्यावे लागल्याचे युवकांनी सांगितले. चहा तर दहा रूपयांना कट मिळाला.गरज महत्वाच्या सुविधांचीभरती स्थळ परिसरात पिण्याच्या पाण्याची तसेच सुविधा प्रशासन अथवा सामाजिक संस्थांकडून अपेक्षित आहे. परिसरात मोबाईल टॉयलेटची सुविधा महत्वाची आहे. वाहतुकीच्या दृष्टीने वर्दळीचा परिसर व रस्ता असल्याने नियोजनाची गरज आहे. थंडीचा फटका अनेक तरूणांना सहन करावा लागणार आहे.यंदा भरती होणारचतुळजापूर तालुक्यातील सराटी येथील आम्ही १५ जण भरतीसाठी आलो आहोत. यापूर्वीच्या ५- ६ भरतीमध्ये सहभागी झालो. पात्र ठरलो नाही, परंतू हारही मानली नाही. सातत्याने सराव सुरुच ठेवला. यंदा नंबर लागणार असा विश्वास भारत हिंगमिरे याने व्यक्त केला. आधीच्या भरतीमध्ये कोणत्या कारणामुळे फेल झालो त्यानुसार आम्ही परिपूर्णतेसाठी एकत्रित चर्चा करतो. मुळात व्यसने सोडून चांगल्या मार्गाला लागावे म्हणून आम्ही सर्व चार वर्षांपासून देशसेवेचे ध्येय ठेवून असल्याचे काशीनाथ शंकर राठोड म्हणाला.उमरगा तालुक्यातील हंद्राळ येथील १३ युवक खाजगी वाहनाने आले होते. २०१८ मध्ये उस्मानाबाद येथील भरतीमध्ये होतो. उंची तपासून धावक्षमता तपासली जाते. पात्र न ठरल्यास बाद केले जाते. असा अनुभव आकाश राठोड व सहकाऱ्यांनी सांगितला. गाडीतच जेवण केले. उघडा परिसर दाखवत तिथेच झोपणार असल्याचे युवक म्हणाले.
बीडमध्ये सैन्यभरती मोहीम : उर्मी देशसेवेची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 00:04 IST
भारतीय सैन्य दलाच्या वतीने बीडसह पुणे, अहमदनगर, उस्मानाबाद, लातूर या पाच जिल्ह्यातील तरुणांसाठी ४ फेब्रुवारी रात्री ११ पासून पासून भरती प्रक्रिया सुरु होणार असल्याने मंगळवारी सकाळपासून तरूणांचे जथे सैनिकी विद्यालयाच्या परिसरात पहायला मिळाले.
बीडमध्ये सैन्यभरती मोहीम : उर्मी देशसेवेची
ठळक मुद्देनगर रोडवर तरुणांचे लोंढे