शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठ अंबाजोगाईत उभारणार 'कौशल्य विकास’ केंद्र; २५ एकर शासकीय जमीन हस्तांतरित

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2022 13:02 IST

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती मागणी

अंबाजोगाई -अंबाजोगाई येथे मंजूर करण्यात आलेल्या 'कौशल्य विकास’ केंद्रासाठी २५ एकर शासकीय जमीन  डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडे हस्तांतरित करण्यात येऊन ताबा देण्यात आला. विद्यापीठाने सदरील जमिनीचे हस्तांतरण करण्याची मागणी बीड जिल्हा प्रशासनाकडे केली होती. या केंद्रासाठी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नरेंद्र काळे यांनी विशेष प्रयत्न केले होते. 

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने अंबाजोगाई येथे कौशल्य विकास केंद्र उभा करण्यास मंजुरी दिली होती. या कौशल्य विकास केंद्रासाठी २५ एकर शासकीय जमीनीची आवश्यकता होती. त्यामुळे विद्यापीठाने जिल्हा प्रशासनाकडे जमीन उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. सदर मागणीला अनुसरून बीड जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी अंबाजोगाई लगतच्या काळवटी तांडा येथील २५ एकर जमीन कौशल्य विकास केंद्रासाठी देण्याचे आदेश १७ जून रोजी दिले होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार काळवटी तांडा येथील नवीन गट क्र. १/अ/५ मधील १० हेक्टर म्हणजेच २५ एकर जमिनीचे हस्तांतरण कौशल्य विकास केंद्रासाठी विद्यापीठाकडे करण्यात येऊन मंगळवारी (०५ जुलै) रीतसर ताबा देण्यात आला. त्यामुळे लवकरच या केंद्राची उभारणी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या केंद्रातून कौशल्याधारीत व व्यवसायाभिमुख शिक्षण दिले जाणार असून बीड जिल्ह्यातील विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. 

अंबाजोगाईच्या शैक्षणिक विकासातील मैलाचा दगडअंबाजोगाई परिसराच्या शैक्षणिक विकासातील ही एक महत्वाची घटना आहे. पुढील काळात हे कौशल्य विकास केद्र लवकरात लवकर कार्यान्वित व्हावे व त्या माध्यमातून परिसरातील विद्यार्थ्यांना कौशल्याधारीत व व्यवसायाभिमुख दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी प्रयत्न करणार आहे. या केंद्राचा बीड  जिल्ह्यातील ग्रामीण विद्यार्थ्यांना फायदा होईल.- डॉ. नरेंद्र काळे, विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादBeedबीडEducationशिक्षण