शहरं
Join us  
Trending Stories
1
हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
2
रस्त्यावर भटके कुत्रे दिसले नाही पाहिजे, त्यांना..; सर्वोच्च न्यायालयाचे तीन मोठे आदेश
3
२०२६ हे पाकिस्तानसाठी 'प्रलयाचे वर्ष'? ज्योतिषांचा धक्कादायक अंदाज; भारतासोबत मोठ्या युद्धाचे संकेत...
4
Video - बॅकबेंचर ते चार्टर्ड अकाउंटंट... लेक CA होताच बापाने मारली घट्ट मिठी, डोळ्यांत आनंदाश्रू
5
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
6
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
7
नितीश कुमारांची डोकेदुखी वाढणार? वाढीव मतदानामुळे सत्तांतराची शक्यता? आकडे काय सांगतात?
8
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
9
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
10
Jara Hatke: पूजेत, धर्मकार्यात वापरला जाणारा पांढरा शुभ्र कापूर कसा तयार करतात माहितीय?
11
दूध आणायला जातो म्हणाला, १९ दिवसांनी मृतदेह सापडला; रशियात बेपत्ता झालेल्या भारतीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने राजस्थान हादरले
12
कार्तिक संकष्ट चतुर्थी २०२५: चंद्रोदयाची वेळ काय? ‘असे’ करा व्रत; राहु काळ, शुभ मुहूर्त पाहा
13
रणबीर-आलियाने धूमधडाक्यात साजरा केला राहाचा वाढदिवस, इनसाईड व्हिडीओही व्हायरल
14
Katrina Kaif-Vicky Kaushal Baby: गुडन्यूज! कतरिनाने दिला गोंडस बाळाला जन्म, विकी कौशलचा आनंद गगनात मावेना, म्हणाला...
15
अमेरिकेचा चीनला मोठा झटका! आणखी एका कंपनीने कामकाज केलं बंद; ४०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली
16
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
17
'मनी हाइस्ट' पाहून १५० कोटींची फसवणूक; लोकांना 'असं' अडकवायचे जाळ्यात, झाला पर्दाफाश
18
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
19
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
20
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात

विश्वाला बुद्धांच्या विज्ञानवादी धम्माची नितांत गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 00:20 IST

तथागत सिध्दार्थ गौतम बुद्धांचा बौद्ध धम्म हा विज्ञानवादी आहे. या धम्मात माणसा-माणसामध्ये कधीही भेदभाव केला जात नाही. आजघडीला या देशालाच नव्हे तर अवघ्या विश्वाला बुध्दांच्या विज्ञानवादी धम्माची नितांत गरज आहे.

ठळक मुद्देभीमराव आंबेडकर : बीडमध्ये बौद्ध धम्म परिषदेला लोटला जनसागर; अनेक मान्यवरांचीही उपस्थिती

बीड : तथागत सिध्दार्थ गौतम बुद्धांचा बौद्ध धम्म हा विज्ञानवादी आहे. या धम्मात माणसा-माणसामध्ये कधीही भेदभाव केला जात नाही. आजघडीला या देशालाच नव्हे तर अवघ्या विश्वाला बुध्दांच्या विज्ञानवादी धम्माची नितांत गरज आहे. एवढेच नाही तर प्रज्ञा, शील, करुणेची शिकवण देणाऱ्या बुद्धांच्या धम्म पथाचा मार्ग हा मानवतेच्या समतेची पहाट असल्याचे मत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातु भीमराव आंबेडकरबीड शहरात भिक्खु धम्मशील यांच्या सातव्या वर्षावासाच्या समापनानिमित्त १ नोव्हेंबर रोजी भव्य बौध्द धम्म परिषदेचे आयोजन केले होते. त्यावेळी आंबेडकर बोलत होते. यावेळी धम्म परिषदेचे मार्गदर्शक भिक्खु डॉ.उपगुप्त महाथेरो, सोहळ्याचे उद्घाटक भिक्खु के. संघिरक्षत महाथेरो, अध्यक्षस्थ भिक्खु धम्मसेवक महाथेरो, भिक्खु शरणानंद महाथेरो, स्वागताध्यक्ष राजेंद्र घोडके, प्रमुख अतिथी डॉ.एस.पी.गायकवाड, डॉ.अरविंद गायकवाड, सत्यशोधक ओबीसी परिषदेचे अध्यक्ष संदिप उपरे यांच्यासह देशभरातून आलेल्या भन्तेंची लक्षणीय उपस्थिती होती.भीमराव आंबेडकर म्हणाले, देशाच्या प्रत्येक शहरात व गावागावात बौद्ध धम्माच्या परिषदा होणे गरजेचे आहे. तथागत सिध्दार्थ गौतम बुध्दांनी सांगितलेले विज्ञानवादी तत्वज्ञानच या विश्वाला खºया अर्थाने मानवतेकडे घेऊन जाणारे आहे. ज्या राष्ट्रांनी बुध्द धम्म स्वीकारला त्या राष्ट्रांची प्रगती झालेली आहे, आणि भारत देशात बुध्दांचा जन्म होऊनही तो देश आजही अंधश्रध्दा आणि रूढी परंपरेत गुरफटलेला दिसून येतो. प्रास्ताविक प्रा.प्रदिप रोडे यांनी केले.यावेळी भिक्खू बोधीपालो महाथेरो, भिक्खू प्रा.डॉ.एम.सत्यपाल महाथेरो, भिक्खू यशकाश्यपायन महाथेरो, भिक्खू करूणानंद थेरो, भिक्खू ज्ञानरक्षित थेरो, भिक्खू एम.धम्मज्योती थेरो, भिक्खू काश्यप थेरो, भिक्खू हर्षबोधी थेरो, भिक्खू पय्यातीस थेरो, भिक्खू महाकाश्यप थेरो, भिक्खू मुदितानंद थेरो, भिक्खू शिवली बोधी थेरो, भिक्खू धम्मदर थेरो, भिक्खू धम्मरिक्षत, भिक्खू पय्यानंद, भिक्खू शीलरत्न, भिक्खू सुभूती, भिक्खू दिपंकर, भिक्खू बोधिशील, भिक्खू संघपाल, भिक्खू नागसेनबोधी, भिक्खू संघप्रिय, भिक्खू रेवतबोधी, भिक्खू एस.नागसेनसह भन्तेंनी धम्मदेशना दिली. बौध्द धम्म परिषद यशस्वी करण्यासाठी संयोजक भन्ते धम्मशिल यांच्यासह प्रिशदर्शी धम्मसंस्कार शिक्षण संस्था, वर्षावास तसेच बुध्दविहार संयोजन समितीसह सर्व बौध्द उपासक-उपासिकांनी परिश्रम घेतले.बौध्द धम्म रॅलीने वेधले लक्षडॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे पंचरंगी धम्म ध्वजारोहणानंतर धार्मिक देखावे व बुध्द मुर्तींसह भिक्खु संघाची बीड शहरातून धम्म मिरवणूक काढण्यात आली होती. या बौध्द धम्म रॅलीमध्ये देशाच्या विविध राज्यातून आलेले भन्ते सामिल झाले होते. श्वेत वस्त्र परिधान करू बौध्द उपासक-उपासिका, आंबेडकरी जनता मोठ्या संख्येने सहभागी होती.

टॅग्स :BeedबीडReligious programmeधार्मिक कार्यक्रम