शहरं
Join us  
Trending Stories
1
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
2
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
3
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
4
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
5
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
6
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
7
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
8
'EVM एक ब्लॅक बॉक्स आहे अन्...', लोकसभेच्या निकालांवर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
9
EVM वर आता इलॉन मस्क यांनी घेतली शंका; भाजपाचे प्रत्युत्तर, नेते म्हणाले, “आम्ही शिकवणी घेऊ”
10
EVM अनलॉक करणारा फोन वायकरांच्या नातेवाईकाकडे; भाजप म्हणतं, "शब्दांची फेरफार करुन..."
11
विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! शाळा- महाविद्यालयातच मिळणार एसटी बसचा प्रवासी पास
12
"एकदा जो गद्दारी करतो, तो कायम गद्दारच असतो," आदित्य ठाकरेंची रविंद्र वायकरांवर टीका
13
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
14
'फादर्स डे' निमित्त प्रसाद ओकच्या पत्नीची चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात पाणी आणणारी खास पोस्ट
15
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत
16
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल
17
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
18
निलेश लंकेंनीही घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; मराठा आरक्षणाबद्दल म्हणाले...
19
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
20
INDW vs SAW Live : भारताने टॉस जिंकला! दीप्तीसाठी ऐतिहासिक सामना; आशा सोभनाचे पदार्पण

निलंगेकरांच्या अनुपस्थितीने सुरेश धसांच्या तंबूमध्ये अस्वस्थता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2018 2:00 PM

उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य मतदार संघांतून राष्ट्रवादीचे माजी मंत्री सुरेश धस यांनी भाजपा-शिवसेना महायुतीकडून ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला

ठळक मुद्देया मतदारसंघाची सारी जबाबदारी भाजपाने मुंडे आणि निलंगेकरावर सोपवली होती. यावेळी कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांची अनुपस्थिती उपस्थितांना चांगलीच खटकली.

- सतीश जोशी 

बीड : उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य मतदार संघांतून राष्ट्रवादीचे माजी मंत्री सुरेश धस यांनी भाजपा-शिवसेना महायुतीकडून ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला असला तरी कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांची अनुपस्थिती उपस्थितांना चांगलीच खटकली. विशेषत: या मतदारसंघाची सारी जबाबदारी भाजपाने मुंडे आणि निलंगेकरावर सोपवली होती. 

या मतदार संघात पक्षीय बलाबल बघितले तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ३३६, काँग्रेसचे १९१ असे एकूण ५२७ तर भाजपा ३०२, शिवसेना ६५ असे एकूण ३६७ मतदार आहेत. एमआयम २० आणि इतर ९२ अशी एकूण मतदारांची संख्या १००६ आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाल्यामुळे राष्ट्रवादीचे रमेश कराड यांची बाजू अधिक भक्कम झाली. रमेश कराड यांनी भाजपातून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत तर सुरेश धसांनी राष्ट्रवादीतून भाजपात जात ही उमेदवारी मिळवली आहे. हा मतदारसंघ काँग्रेसकडे होता आणि लातूरचे दिलीपराव देशमुख हे विद्यमान आमदार आहेत. निवडणूक लढविण्यास दिलीपराव इच्छुक नसल्यामुळे त्यांचे खंदे समर्थक अंबाजोगाईचे माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी निवडणुकीची तयारी केली होती. परंतु आघाडी झाल्यामुळे त्यांच्या महत्वाकांक्षेवरही पाणी फेरले असले तरी त्यांची ही नाराजी रमेश कराड यांना दूर करावी लागणार आहे.

गुरुवारी सुरेश धस यांनी उस्मानाबादेत उमेदवारी अर्ज दाखल करताना पालकमंत्री पंकजा मुंडे, खा.डॉ. प्रीतम मुंडे, खा. सुनील गायकवाड, भाजप प्रदेश सरचिटणीस आ. सुजीतसिंह  ठाकूर, आ.आर.टी. देशमुख, आ.भीमराव धोंडे, आ.सुधाकर भालेराव, आ. विनायक पाटील, माजी आ. गोविंदराव केंद्रे, आ. लक्ष्मण पवार, आ. संगीता ठोंबरे, रमेश आडसकर, रमेश पोकळे, नगराध्यक्ष डॉ. स्वरुपसिंह हजारी, सहाल चाऊस, हारुण इनामदार, दत्ता कुलकर्णी, प्रवीण घुगे, संतोष हंगे, गयाताई कराड आणि बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. 

मी नाराज नाही संभाजी पाटील निलंगेकर यांची अनुपस्थिती सुरेश धसांच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता निर्माण करणारी होती. या मतदारसंघातून संभाजी पाटील हे आपल्या बंधूस उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्नशील होते, परंतु ती न मिळाल्यामुळे त्यांनी अशी ही नाराजी व्यक्त केली, अशी चर्चाही ऐकावयास मिळाली. यासंदर्भात निलंगेकरांनी एक व्हिडीओ क्लिप व्हायरल केली असून त्यात आपण नाराज नसून राज्याचा प्रतिनिधी म्हणून एका पूर्वनियोजित कार्यक्रमासाठी राजस्थानला गेलो होतो, असे म्हटले आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकSuresh Dhasसुरेश धसPankaja Mundeपंकजा मुंडेBJPभाजपाShiv Senaशिवसेना