शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

उद्धवजी, ओबीसींच्या दु:खाची जाणीव असल्यास आरक्षणासाठी रस्ता निघतोच: शिवराजसिंह चौहान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2022 17:51 IST

ओबीसी आरक्षणावर कोणी माझ्यासोबत आहे की नाही हे न पाहता मी पुन्हा कोर्टात गेलो.

गोपीनाथ गड ( बीड) : ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक नाही, असे मी जाहीर केले. यावेळी कोणी माझ्यासोबत आहे की नाही हे न पाहता मी पुन्हा कोर्टात गेलो. संपूर्ण प्रशासन कामाला लावत आवश्यक माहिती जमा केली. चार महिने दिवसरात्र एक करत काम केले. ओबीसींचे आरक्षण मिळाल्यानंतरच दम घेतला. ओबीसींच्या दु:खाची जाणीव असेल तर आरक्षणासाठी नक्कीच रस्ता निघतो, असा टोला उद्धव ठाकरे यांना मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी लगावला. ते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीदिनाच्या गोपीनाथ गड येथील कार्यक्रमात बोलत होते. 

चौहान पुढे म्हणाले, आम्ही निवडणुकीची तयारी करत होतो. तेवढ्यात ओबीसी आरक्षण रद्द झाल्याचे कळले. त्याच क्षणी कोणी सोबत असो की नसो ओबीसी आरक्षणा शिवाय निवडणुका होणार नाहीत असे मी जाहीर केले. त्यानंतर कोर्टात गेलो. मागासवर्ग आयोगाला सर्वे करायला सांगितले. एक रात्रभर आयोगासोबत किती टक्के आरक्षण पाहिजे, यावर विचार केला. त्यानंतर दिल्लीला जाऊन मोठे वकील नेमले. त्यांना मी स्वतः ब्रिफिंग दिले. चारमहिने दिवसरात्र एक करत काम केले. तेव्हा 35 टक्के आरक्षण न्यायालयाने दिले. त्यानंतर निवडणुका जाहीर केल्या, असे माहिती मध्यप्रदेशाच्या ओबीसी आरक्षणाच्या लढ्याबद्दल चौहान यांनी दिली. हाच धागा पडकून चौहान यांनी महाराष्ट्रातील ओबीसींच्या दु:खाची जाणीव असल्यास नक्कीच आरक्षणासाठी मार्ग निघेल असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला. 

मुंडे नवा इतिहास रचून गेलेस्व. गोपीनाथ मुंडे यांनी भाजपला गावोगाव नेले. मी थकणार नाही, मी थांबणार नाही, कोणासमोर झुकणार नाही, संघर्षाचे नाव गोपीनाथ मुंडे होते. संघर्ष यात्र काढून कॉंग्रेसला सत्तेबाहेर हाकलले. 1995 ला अंडरवर्ल्डला राज्यातून हाकलून लावले. ऊसतोड मजुरांना न्याय दिला. जनतेसाठी जगले. मुंडे नवा इतिहास रचून गेले. त्यांना मी कधी विसरू शकत नाही, अशा भावना चौहान यांनी व्यक्त केल्या. 

मुली असाव्या तर अशा मुलांपेक्षा मुली आईवडिलांची शेवटच्या श्वासापर्यंत सेवा करतात. मुलींचे कर्तृत्व मोठे आहे. हे स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या तिन्ही मुलींकडे पाहून सिद्ध होते. मुली असाव्यात तर अशा, असे मुंडे भगिनींचे कौतुक यावेळी मुख्यमंत्री चौहान यांनी केले. 

टॅग्स :BeedबीडPankaja Mundeपंकजा मुंडेshivraj singh chauhanशिवराज सिंह चौहानOBC Reservationओबीसी आरक्षण