शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकी, रिक्षाच्या धडकेत दोघे ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 00:05 IST

तालुक्यातील दोन ठिकाणी झालेल्या रस्ते अपघातात दोघांचा मृत्यू झाला. या घटना ढेकणमोहा व काकडहिरा येथे घडल्या. दुचाकी घसरल्याने तरुणाचा तर रिक्षाने धडक दिल्याने उपचार घेताना एका वृद्धाचा मृत्यू झाला.

बीड : तालुक्यातील दोन ठिकाणी झालेल्या रस्ते अपघातात दोघांचा मृत्यू झाला. या घटना ढेकणमोहा व काकडहिरा येथे घडल्या. दुचाकी घसरल्याने तरुणाचा तर रिक्षाने धडक दिल्याने उपचार घेताना एका वृद्धाचा मृत्यू झाला.अनंत आश्रुबा सोळंके (३२ रा.ढेकणमोहा, ता.बीड) असे दुचाकी घसरुन गंभीर जखमी होऊन मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. ढेकणमोहा येथील रामदास बबन काळे व अनंत सोळंके हे दोघे बुधवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरुन (क्र. एम.एच.२३ ए.व्ही. ७७०८) घाटसावळी येथून ढेकणमोह्याकडे येत होते. घाटसावळीच्या कमानीजवळ दुचाकी अचानक घसरली यात मागे बसलेल्या अनंत सोळंके या तरुणाच्या डोक्याला गंभीर मार लागला तर रामदास किरकोळ जखमी झाला. उपचारासाठी दोघांनाही बीड येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.तिथे उपचार घेताना बुधवारी सायंकाळी अनंत सोळंके या तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणी मयताचे सासरे कोंडीराम बागलाने यांच्या खबरीवरुन रुग्णालय पोलीस चौकीत घटनेची नोंद करण्यात आली.अपघाताची दुसरी घटना बीड तालुक्यातील काकडहिरा फाट्याजवळ रविवारी सकाळी घडली. वैजनाथ अप्पासाहेब बागलाने (६५ रा.काकडहिरा) यांना रस्त्यावरुन जाणाऱ्या भरधाव रिक्षाने जोराची धडक दिली. यात ते गंभीररीत्या जखमी झाले.उपचारासाठी त्यांना तातडीने बीड येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे उपचार घेताना गुरुवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी रुग्णालय पोलीस चौकीत नोंद करण्यात आल्याची माहिती सहायक फौजदार बब्रुवाहन गांधले यांनी सांगितले.

टॅग्स :BeedबीडAccidentअपघातDeathमृत्यू