शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

बीड वाहतूक शाखेच्या महिला कर्मचाऱ्यास मुजोर दुचाकीस्वाराची भररस्त्यावर धक्काबुक्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 17:52 IST

रस्त्यावर लावलेली दुचाकी बाजूला काढा, असे म्हणल्यावरून एका मुजोर दुचाकीस्वाराने वाहतूक शाखेच्या महिला कर्मचाऱ्यास भररस्त्यावर शिवीगाळ करून धक्काबुक्की केली.

बीड : रस्त्यावर लावलेली दुचाकी बाजूला काढा, असे म्हणल्यावरून एका मुजोर दुचाकीस्वाराने वाहतूक शाखेच्या महिला कर्मचाऱ्यास भररस्त्यावर शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. हा प्रकार रविवारी सायंकाळच्या सुमारास बीड शहरातील भाजीमंडईत घडला. वाहनचालकाविरोधात बीड शहर ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिला, मुलींवर कारवाई करण्यासाठी सुलभ व्हावे, यासाठी पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी मागील वर्षीपासून वाहतूक शाखेत महिला कर्मचाऱ्यांची भरती केली. या महिलांचे कामही चांगले आहे. परंतमु काही मुजोर वाहनचालकांकडून त्यांना धक्काबुक्की आणि भररस्त्यात शिवीगाळ होत असल्याने संताप व्यक्त होत आहे. रविवारी सायंकाळी भाजी मंडई परिसरात एक महिला कर्मचारी वाहतूक सुरळीत करत होत्या. याचवेळी एमएच २३-५०५८ ही दुचाकी त्यांना  रस्त्यावर उभा दिसली. त्यांनी दुचाकी कोणाची आहे, अशी विचारणा केली, परंतु पुढे कोणीच आले नाही. शेवटी स्वत: दुचाकी बाजूला करत असताना सय्यद फैजानअली सय्यद तारेकअली हा तेथे आला. माझी दुचाकी कशाला काढता असे म्हणत त्याने हुज्जत घातली.

हा सर्व प्रकार बॉडीआॅन कॅमेऱ्यात कैद करीत असताना सय्यदने हा कॅमेरा हिसकावून घेत फेकून दिला. तसेच त्यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. सदरील महिलेने हा प्रकार आपल्या वरिष्ठांना सांगितला. त्यानंतर येथे मोठा जमाव जमला. सय्यदला तात्काळ पोलिसांनी ताब्यात घेत शहर पोलिसांच्या स्वाधीन केले. त्याच्याविरोधात शासकीय कामात अडथळासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोउपनि जाधव हे करीत आहेत.

बीडमध्ये पोलिसच असुरक्षित?यापूर्वी देखील छत्रपती शिवाजी महाराज चौकात वाहतूक शाखेच्या एका पोलीस कर्मचाऱ्यास धक्काबुक्की झाली होती. यामध्ये शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. आता पुन्हा चक्क महिला कर्मचाऱ्यास भररस्त्यावर आणि वर्दळीच्या ठिकाणी शिवीगाळ व धक्काबुक्की झाल्याने खळबळ उडाली आहे. वारंवारच्या या घटनांवरून पोलिसच असुरक्षित असल्याची चर्चा होत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीडBeed policeबीड पोलीसtraffic policeवाहतूक पोलीस