शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

कागदपत्रांची मागणी केल्याने दुचाकीस्वाराची वाहतूक पोलिसाला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 20:14 IST

इतर पोलिसांनी धाव घेत वाद मिटवला

बीड : कागदपत्रांची विचारणा केल्याने एका दुचाकीस्वाराने वाहतूक पोलीस कर्मचा-याला शिवीगाळ करीत मारहाण केली. ही घटना गुरूवारी दुपारी वाहतूक शाखेच्या पोलीस चौकीसमोर घडली. याप्रकरणी शिवाजीनगर ठाण्यात दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल झाला आहे.

परशुराम ज्ञानदेव माने (३६ रा.हातोला पारगाव जि.बीड ह.मु. फयाज नगर एमआयडीसी वाळूज ता.जि.औरंगाबाद) असे आरोपीचे नाव असून एस.एम.सावंत मारहाण झालेल्या कर्मचाºयाचे नाव आहे. माने हा कार्यक्रमानिमित्त बीडला आला होता. परत गावी जात असताना त्याची दुचाकी (एमएच २० सीपी ५३६६) पोलीस चौकीसमोर सावंत यांनी अडविले. लायसन्सची विचारणा केल्यावर त्याने औरंगाबादला असल्याचे सांगितले. दंड भरा म्हणल्यावर अरेरावी करीत दंड भरण्यास नकार दिला. दंड पाहिजे असल्यास औरंगाबादला चला, असा उलट प्रश्न केला. त्याची दुचाकी खाली घेण्यास सांगितल्याने त्याला राग अनावर झाला आणि त्याने खाली उतरत सावंत यांचे गचुरे पकडत पोटात मारले. त्यामुळे ते खाली कोसळले.

बाजुच्या इतर पोलीस कर्मचाºयांनी धाव घेत हा वाद मिटविला. ही सर्व माहिती पोलीस निरीक्षक राजीव तळेकर यांना दिल्यानंतर ते घटनास्थळी आले. त्यानंतर मानेला शिवाजीनगर ठाण्यात नेण्यात आले. रात्री ७.30 वाजता त्याच्यावर शासकीय कामात अडथळा आणण्यासह इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :BeedबीडPoliceपोलिसTrafficवाहतूक कोंडी