शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

दोन महिन्यांत १० बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 23:46 IST

भरधाव येणारी वाहने, त्यातच दुपदरी रस्ता, दुभाजकाचा अभाव, यामुळे रस्ता पुढे निमुळता झाल्याने वाहतुकीची होणारी कोंडी यामुळे अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहे.

ठळक मुद्देअंबाजोगाई-लातूर नवीन रस्त्याच्या उद्घाटनापूर्वीच अपघातांची मालिका

अंबाजोगाई: भरधाव येणारी वाहने, त्यातच दुपदरी रस्ता, दुभाजकाचा अभाव, यामुळे रस्ता पुढे निमुळता झाल्याने वाहतुकीची होणारी कोंडी यामुळे अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहे. गेल्या दोन महिन्यात दहा जणांचे बळी गेले, तर अनेक जण जखमी झाले. अंबाजोगाई - लातूर नवीन रस्त्याच्या उद्घाटनापूर्वीच अपघातांची मालिका सुरू झाल्याने प्रवाशांमध्ये भीती निर्माण झाली आहे.अंबाजोगाई ते लातूर हा मुख्य रहदारीचा रस्ता आहे. केंद्र शासनाने भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्या वतीने बीड जिल्ह्यात ६ हजार ४२ कोटी रुपये खर्च करून रस्त्याची कामे सुरू केली. औरंगाबाद ते लातूर या रस्त्याची मोठी रहदारी याच रस्त्यावर दिसून येते.सदरील रस्त्याचे काम सुरू आहे. रेणापूर ते बर्दापूर या अंतरावर हा रस्ता चौपदरी झाला. मात्र, बर्दापूरपासून पुढे अंबाजोगाई साखर कारखान्यापर्यंत हा रस्ता पुढे दोन पदरीच ठेवण्यात आला. मोठा झालेला रस्ता अचानकच निमूळता व लहान झाला. त्यात या रस्त्यावर दुभाजकही बसविले नाहीत.चार पदरी रस्त्याची वाहतूक दोन पदरी रस्त्यावर येऊन ठेपली. अत्यंत वर्दळीच्या या रस्त्यावर रस्ता लहान झाल्याने वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणावर वाढली.शनिवारी रात्री झालेल्या तिहेरी अपघतात तिघांचा मृत्यू झाला. या रस्त्याने येणाऱ्या प्राध्यापकाला वाहनाने चिरडले. रस्ता ओलांडणा-या महिलेचा मृत्यू झाला. दोन महिन्यांपूर्वी लग्नाचे वºहाड घेऊन येणारा टेम्पो मातीचा ढिगारा चुकवतांना समोरच्या वाहनावर धडकला.या अपघातात दोघे ठार तर १० जण गंभीर जखमी झाले होते. उभ्या वाहनांवर जीप आदळल्याने सेलू येथील दोघे गंभीर जखमी झाले होते. तर शनिवारी रात्री याच रस्त्यावर झालेल्या अपघातात तीन जणांचे बळी गेले. चार जखमींवर उपचार सुरु आहेत. गेल्या महिनाभरात लहान-मोठ्या अपघातात अनेक जण जखमी झाले आहेत.नवीन झालेला हा रस्ता पूर्ण होण्यापूर्वीच धोकादायक ठरू लागला आहे. वाहनचालकांत या रस्त्याबाबत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सुरक्षित वाहतुकीच्या दृष्टीकोनातून तात्काळ उपाययोजना करण्याची गरज आहे. लक्ष देण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.चौपदरीकरण करा, अन्यथा आंदोलन...!बर्दापूर फाटा ते अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना या मुख्य रस्त्याचे चौपदरीकरण करावे ही मागणी सातत्याने प्रशासकीय पातळीवर मांडण्यात आली.याबाबतचा पाठपुरावा रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडेही करण्यात आला. तरीही शासन या संदर्भात गांभीर्याने विचार करत नाही.रस्ता लहान झाल्याने अपघाताचे सत्र सुरू आहे. वाढते अपघात रोखण्यासाठी चौपदरीकरण करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांनी दिला आहे.या रस्त्यावर वाढलेली वाहतूक लक्षात घेता रुंदीकरणासाठी तत्काळ निर्णय अपेक्षित आहे.

टॅग्स :Beedबीडroad safetyरस्ते सुरक्षाAccidentअपघातagitationआंदोलन