शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

धारुर-तेलगाव रस्त्यावर भीषण अपघातात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2023 19:31 IST

घटनास्थळी उपस्थित लोकांनीही जखमींना मदत न करता बघ्याची भूमिका घेतली.

धारुर : तेलगाव कडून धारुर कडे येत असलेल्या दुचाकीला आंबेवडगाव ( ता . धारुर ) जवळ अज्ञात वाहनाने धडक दिल्याने घडलेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघेही ठार झाल्याची घटना  बुधवारी ( दि. १२ ) दुपारी घडली आहे.

पंडित सुतारे ( वय ३८ वर्ष ) , अनिल अडागळे दोघे रा. झरी ( ता. सेलु जि. परभणी ) असे मयतांची नावे आहेत. हे दोघे झरी येथून दुचाकीवरून तेलगाव कडून धारुरच्या दिशेने येत होते. दरम्यान ते आंबेवडगाव ( ता. धारुर ) जवळ आले असता अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यामुळे ते दोघेही दुचाकीवरून रस्त्यावर पडल्याने जबर मार लागला. यामध्ये पंडित सुतारे यांचा जागीच मृत्यू झाला. अनिल अडागळे हे गंभीर जखमी झाले. त्यांना १०८ रुग्णवाहिकेतून धारुर येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले.

गंभीर जखमी असल्याने येथे प्रथमोपचार करुन पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथे स्वाराती रुग्णालयात रेफर करण्यात आले. अंबाजोगाई येथे घेऊन जात असताना रस्त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. धडक दिल्यानंतर हे दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडलेले असताना यांना मदत करण्या ऐवजी तो वाहन चालक फरार झाल्याने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी उपस्थित लोकांनीही जखमींना मदत न करता बघ्याची भूमिका घेतली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड