शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शुभकल्याण मल्टीस्टेटवर अंबाजोगाईत आणखी दोन गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 20:44 IST

संचालक मंडळावर न्यायालयाच्या आदेशाने अंबाजोगाई शहर पोलिसात आणखी दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

अंबाजोगाई (बीड ) : विविध प्रसिद्धी माध्यमांद्वारे आकर्षक वायाजाचे आमिष दाखवून दोन ठेवीदारांचे मुदत ठेवीच्या स्वरूपातील एकूण साडेआठ लाखांची रक्कम हडप केल्याप्रकरणी शुभकल्याण मल्टीस्टेटच्या संचालक मंडळावर न्यायालयाच्या आदेशाने अंबाजोगाई शहर पोलिसात आणखी दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

ठेवीदारांना कोट्यावधी रुपयांना लुबाडल्या प्रकरणी ‘शुभकल्याण’वर यापूर्वीच जिल्ह्यात विविध ठिकाणी गुन्हे नोंद झाले आहेत. अद्यापही गुन्हे दाखल करण्याचे सत्र थांबलेच नसून फसवणुकीची आणखी प्रकरणे समोर येत आहेत. शुभकल्याण द्वारा विविध प्रसार माध्यमातून करण्यात आलेल्या आकर्षक व्याजदराच्या जाहिरातीला भुलून अंकुश सोपानराव जोगडे यांनी ५ लाख ७ हजार १०२ रुपयांच्या तर संतोष रामराव पौळ (दोघेही रा. पंचायत समिती पाठीमागे, अंबाजोगाई) यांनी ३ लाख ६३ हजार २१७ रुपयांची रक्कम ठेवींच्या स्वरुपात शुभकल्याण मध्ये गुंतवली होती. परंतु, मुदत उलटूनही त्यांना ठेवीची रक्कम देण्यास टाळाटाळ करण्यात येऊ लागली. त्यानंतर मल्टीस्टेटच्या व्यवस्थापकाने बँक बंद पडली असून तुम्हाला काय कार्याचे ते करून घ्या असे म्हणून हात वर केले. त्यामुळे दोन्ही ठेवीदारांनी अंबाजोगाई शहर पोलिसात धाव घेतली.

परंतु, कथित राजकीय दबावापोटी पोलिसांनी त्यांच्या तक्रारीची दखल घेतली नाही. अखेर त्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. न्यायालयाच्या आदेशानुसार अंकुश सोपानराव जोगडे आणि संतोष रामराव पौळ यांच्या दोन वेगवेगळ्या फिर्यादींवरून शुभकल्याण मल्टीस्टेटचा अध्यक्ष दिलीप शंकरराव आपेट, अजय दिलीप आपेट, विजय दिलीप आपेट, अभिजीत दिलीप आपेट, भास्कर बरजंग शिंदे, नागीणीबाई बजरंग शिंदे, कमलबाई बाबासाहेब नखाते, शालिनी दिलीप आपेट, आशा रामराव बिराजदार, प्रतिभा आप्पासाहेब आंधळे, बापुराव ज्ञानोबा सोनकांबळे आणि अंबाजोगाई शाखेचा व्यवस्थापक विठ्ठल दगडुबा काळे यांच्यावर  अंबाजोगाई शहर पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीCourtन्यायालयAurangabadऔरंगाबाद