लोकमत न्यूज नेटवर्कबीड : पाटोदा तालुक्यातील गारमाथा परिसरात ३ जानेवारी रोजी अपघात झाला. टँकरने दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील एक ठार ,तर एक गंभीर जखमी झाले आहेत.३ जानेवारी रोजी सकाळी ९.३० वाजता टॅकर (एमएच १२ क्यू.जे ९७०२) ने दुचाकीला जोराची धडक दिली. यामध्ये दुचाकी लांब रस्त्यावर जावून आदळली, यात दुचाकीवरील उद्धव विठ्ठल कुटे (वय ४४ रा. वंजारवाडी ता.बीड) हे जागीच ठार झाले. त्यांच्यासोबत असलेले प्रभु बडे (रा. ओव्हाळवाडी ता.शिरूर) हे गंभीर जखमी झाले. इतर वाहनचालकांनी ही माहिती संबंधित पोलिसांना दिली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. घटनास्थळी पोलीस अधिकारी पठाण, तांदळे, खरात, पोना. सुभाष मोटे यांनी भेट दिली. टँकर चालक फरार झाला आहे.
टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 00:17 IST