शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
4
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
5
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
6
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
7
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
8
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
9
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
10
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
11
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
12
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
13
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
14
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
15
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
16
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
17
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
18
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
19
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
20
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त

दोन अपघातांत दोन ठार, नऊ जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 23:54 IST

मंगळवारी जिल्ह्यातील आष्टी व गेवराई तालुक्यात झालेल्या दोन अपघातात दोन जण ठार तर नऊ जण जखमी झाले.

बीड : मंगळवारी जिल्ह्यातील आष्टी व गेवराई तालुक्यात झालेल्या दोन अपघातात दोन जण ठार तर नऊ जण जखमी झाले.आष्टी तालुक्यात पोलीस जीप आणि कारचा समोरासमोर झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार तर आठ जण जखमी झाले. हा अपघात मंगळवारी पहाटे पाच वाजता झाला. बाळासाहेब दादाराव देवगडे (वय ४५) असे अपघातातील मृताचे नाव आहे.केज तालुक्यातील लहुरी येथील देवगडे हे सध्या डोंबिवली येथे राहतात. सोमवारी रात्री देवगडे कुटुंब व नातेवाईक डोंबिवली येथून कारने (एमएच०१- बीके ९२४९) मूळ गावी लहुरीकडे निघाले होते. मंगळवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास आष्टी पोलीस ठाण्यापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर पोलीस जीप (एमएच २३-एफ १११७) आणि त्यांच्या कारची धडक झाली. यात कारमधील बाळासाहेब देवगडे जागीच ठार झाले. तर किशोर बाळासाहेब देवगडे (२३), सोनाली देवगडे (२०) (दोघे रा. लहूरी, ता. केज), वसंत डागे (२५) , सुमन वसंत डांगे (२३) (दोघेही रा. कोल्हेवाडी ता.केज), तसेच आर्यन व आराध्या ही चिमुकलेही जखमी झाले. तर पोलिस जीपमधील चालक हनुमंत बागर, विठ्ठल नरवडे हे जखमी झाले. फौजदार डॉ. विशाल शहाणे, पो. ह. गणेश भोसले, पो. कॉ. सचिन कोळेकर, पो. ह. नवनाथ काळे, पो. ना. पांडूरग दराडे, पो. कॉ. अनिल राऊत यांनी तात्काळ जखमींना येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले.

टॅग्स :BeedबीडAccidentअपघातDeathमृत्यू