शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये दोनशे हेक्टरवरील डाळिंबाच्या बागा वाळल्या; केळी, आंब्याच्या बागांत तीच परिस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2019 04:36 IST

आईच्या नावे असलेल्या साडेनऊ एकरपैकी एक एकर क्षेत्रात डाळिंबाची पाच वर्षापूर्वी लागवड केली.

- दीपक नाईकवाडेकेज (जि. बीड) : बारा वर्षांपूर्वी लागवड करून जोपासलेल्या डाळिंबाच्या दोनशे हेक्टर क्षेत्रातील बागा यावर्षीच्या दुष्काळाने वाळून गेल्याने उंदरी (ता. केज) येथील शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. केळी व आंब्याच्या बागांची अशीच परिस्थिती झाली आहे.उंदरी येथे २००८ पासून येथील शंभरावर शेतकऱ्यांनी भगवा जातीच्या डाळिंबाची लागवड करण्यास सुरुवात केली. डाळिंबाच्या विक्रमी उत्पादनासाठी उंदरचे नाव महाराष्ट्रात झाले. त्यासाठी तत्कालीन कृषी आयुक्त उमाकांत दांगट यांनी प्रोत्साहन दिले.दुष्काळाने विहिरीसह बोअरवेल व शेततळ्यातील पाणी आटल्याने शेजारच्या शेतकºयांकडून एक हजार रुपये तासाने पाणी घेतले. मात्र पाणी कमी पडल्याने केळीची बाग ऐन भरात वाळून गेली, असे उत्तम ठोंबरे यांनी सांगितले.आईच्या नावे असलेल्या साडेनऊ एकरपैकी एक एकर क्षेत्रात डाळिंबाची पाच वर्षापूर्वी लागवड केली. एक एकरात आंबा व शेवगा लावला. डाळिंबास कळी लागून माल धरण्यास सुरुवात होताच पाणी कमी पडल्याने डाळिंबासह आंबा व शेवगा वाळून गेला, अशी व्यथा मधुकर ठोंबरे यांनी मांडली.दोन एकर बाग टँकरवरदहा एकरात २००८ मध्ये भगवा जातीच्या डाळिंबाची लागवड केली. २००८ मध्ये शेततळे घेतले. चार किलोमीटर अंतरावरून पाणी आणले. दुष्काळाने १० एकरची डाळिंबाची बाग दोन एकरवर आल्याने पंचवीस लाख रूपयाचे आर्थिक नुकसान झाले आहे. दोन एकर बाग टँकरने पाणी आणून जगवत आहे.- भागवत ठोंबरे, शेतकरीतीन लाखांचा फटकासाडेचार एकर क्षेत्रापैकी दोन एकरमध्ये गेल्या दहा वर्षांपूर्वी डाळिंबाची लागवड केली होती. दरवर्षी पंधरा टन उत्पादन निघत होते. यावर्षी बाग धरण्यासाठी ७० हजार रुपयांचा खर्च केला. बाग हातची गेल्याने तीन लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. त्यातच भावाच्या शेतातील एक हेक्टर क्षेत्रातील गावरान आंब्याची बाग वाळून गेली.- नानासाहेब मोहन जाधव, शेतकरी

टॅग्स :droughtदुष्काळ