शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
2
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
3
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
4
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
5
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
6
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
7
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
8
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
9
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
10
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
11
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
12
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
13
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
14
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
15
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
16
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
17
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
18
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
19
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
20
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद

२० कोटींच्या घोटाळ्यातील ‘परिवर्तन अर्बन’चे दोन संचालक गजाआड; चार वर्षांपासून होते फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2022 19:20 IST

परिवर्तन अर्बन मल्टिस्टेट को- ऑप क्रेडिट सोसायटी व सामाजिक परिवर्तन पतसंस्थेने जादा व्याजाचे आमिष दाखवून कोट्यवधींच्या ठेवी गोळा केल्या. त्यानंतर अचानकच गाशा गुंडाळला.

बीड : माजलगाव येथील परिवर्तन अर्बन मल्टिस्टेटच्या २० कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील दोन फरार संचालकांना अटक करण्यात १२ जुलैला आर्थिक गुन्हे शाखेला यश आले. ते चार वर्षांपासून तपास यंत्रणेला गुंगारा देत होते. उद्धव सीताराम जाधव (रा. समता कॉलनी, माजलगाव) व महेंद्र विठ्ठल टाकणखार (रा. पंचशीलनगर, माजलगाव) अशी आरोपींची नावे आहेत.

परिवर्तन अर्बन मल्टिस्टेट को- ऑप क्रेडिट सोसायटी व सामाजिक परिवर्तन पतसंस्थेने जादा व्याजाचे आमिष दाखवून कोट्यवधींच्या ठेवी गोळा केल्या. त्यानंतर अचानकच गाशा गुंडाळला. २०१८ मध्ये चेअरमन विजय ऊर्फ भारत अलझेंडेसह २७ संचालक व अधिकारी- कर्मचाऱ्यांवर तब्बल ११ गुन्हे नोंद झाले होते. हा घोटाळा २० कोटींच्या घरात आहे.

आर्थिक गुन्हे शाखेने १२ जुलैला अटक केलेले दोन्ही संचालक ८ गुन्ह्यांत आरोपी आहेत. दरम्यान, आष्टी येथे २०१८ मध्ये गुन्हा नोंद झाला होता तेव्हापासून ते दोघे फरार होते. आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक सुजित बडे, पो.कॉ.भाऊसाहेब चव्हाण, राजू पठाण,संजय पवार यांनी त्यांना अटक केली. १३ जुलैला त्या दोघांना बीडच्या सत्र न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना १६ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले, अशी माहिती सहायक निरीक्षक सुजित बडे यांनी दिली.

एमपीआयडी प्रस्ताव प्रलंबितपरिवर्तन मल्टिस्टेटने बीडसह परभणी, पुण्यात जाळे विणले होते. अल्पावधीत १८ शाखा उघडल्या होत्या. मात्र, अचानक सर्व शाखांना टाळे लागल्याने ठेवीदारांचा जीव टांगणीला लागला आहे. तथापि, आर्थिक गुन्हे शाखेकडे तपास वर्ग झाल्यावर महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम १९९९ (एमपीआयडी )प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला. हा प्रस्ताव अद्याप प्रलंबित असून प्राधिकृत अधिकारी नियुक्त केल्यानंतर पुढील कार्यवाहीला गती येईल, असे आर्थिक गुन्हे शाखेचे प्रभारी उपअधीक्षक संतोष वाळके यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीडArrestअटक