शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

माजलगावसाठी शरद पवारांकडून ट्विस्ट; इच्छुकांच्या गर्दीत मतदारसंघाबाहेरील उमेदवार लादणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2024 23:01 IST

माजलगाव विधानसभेसाठी शरद पवार गटात मोठ्या प्रमाणात आयात, तिघाच्या वादात सारिका सोनवणे यांचे नाव आघाडीवर

- पुरुषोत्तम कारवा माजलगाव ( बीड): माजलगाव मतदार संघातील शरद पवार गटाचा उमेदवार  अद्याप ठरलेला नाही. माजलगावातील तीन मातब्बर उमेदवार माघार घेत नसल्यामुळे  या तिघांच्या वादात  आता एक नवीन चेहरा  पुढे येऊ शकतो. बीडचे खासदार  बजरंग सोनवणे यांच्या पत्नी  सारिका सोनवणे  यांचे नाव आघाडीवर  असल्याचे शरद पवार गटाकडून सांगण्यात येत आहे. यामुळे शरद पवार गटाकडून  मतदार संघाबाहेर उमेदवार लादण्याचा प्रयत्न सुरू आहे.

चार दिवसापूर्वी  राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार  ठरल्यानंतर देखील शरद पवार गटाचे  उमेदवार अद्याप ठरलेले नाहीत.शुक्रवारी संध्याकाळी रमेश आडसकर  यांनी शरद पवार गटात प्रवेश केल्यानंतर  त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती. या उमेदवारीला खासदार बजरंग सोनवणे यांनी विरोध केल्यामुळे शनिवारी त्यांची उमेदवारी जाहीर होऊ शकली नाही. दुसरीकडे खा़ बजरंग सोनवणे हे मोहन जगताप यांना उमेदवारी देण्यासाठी अडून बसलेले आहेत. तर आडसकर  यांना उमेदवारी मिळावी म्हणून  प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील  प्रयत्न करत असल्याचे सांगितले जात आहे. त्याचबरोबर अशोक डक हे शरद पवार यांचे खंदे समर्थक असल्याने त्यांनी देखील  आपल्याला उमेदवारी मिळावी म्हणून अडून बसले आहेत.या तिघाच्या वादामध्ये  खासदार बजरंग सोनवणे यांच्या पत्नी सारिका सोनवणे यांचे शेवटच्या क्षणी  नाव पुढे येऊ लागले आहे.

बाहेरचा उमेदवार कितपत मत घेणार?सारिका सोनवणे या  केज मतदार संघातील असल्यामुळे शरद पवार यांच्याकडून  त्यांची उमेदवारी लादण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे झाल्यास प्रकाश सोळंके यांचा विजय निश्चित मानला जाऊ शकतो. शरद पवार गटाकडून  रमेश आडसकर यांची उमेदवारी निश्चित मानली जात असताना  वादामध्ये त्यांचे नाव मागे पडले असल्याचे देखील बोलले जाऊ लागले आहे. रमेश आडसकर हे मागील पाच वर्षापासून  माजलगाव मतदार संघात दिवसरात्र काम करताना दिसून आले. मागील निवडणुकीत त्यांचा थोड्या मताने  पराभव झाल्यामुळे  त्यांना सध्या मतदारसंघातून सहानुभूती दिसून येत आहे. त्यांना तिकीट न मिळाल्यास  व सारिका सोनवणे यांना उमेदवारी दिल्यास  शरद पवार गटाच्या उमेदवाराचा  पराभव  आजच पक्का मानला जाऊ शकतो .

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकmajalgaon-acमाजलगांव